आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

POSTER OUT: ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या पोस्टरवर दिसला आमिरचा ‘फिरंगी’ अवतार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असेलला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा यावर्षीचा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट असल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यापासून या चित्रपटातील एक एक कलाकारांच्या भूमिकांवरून पडदा उठत आहे. अमिताभ, फातिमा, कतरिना यांच्या भूमिकांवरून पडदा उठल्यानंतर चित्रपटात आमिर कोणती भूमिका साकारतोय याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. पण आता ही उत्सुकता संपली आहे. कारण यशराज फिल्मने चित्रपटातील आमिरच्या लूकवरूनही पडदा उठवला आहे. आमिर या चित्रपटात ‘फिरंगी’च्या भूमिकेत आहे. आमिरचा हा लूक ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’मधल्या जॅक स्पॅरोच्या जवळ जाणारा आहे. हा चित्रपट फिलिप टेलरच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग्स’ या कांदबरीवर आधारीत असल्याचे म्हटले जात आहे. येत्या 27 सप्टेंबर रोजी या या चित्रपटाचा पाहिला ट्रेलर प्रदर्शित होणार असून हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...