आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aamir Khan Gave His Own Introduction, Shared Photo And Wrote 'My Self Lal.. Lal Singh Chadha'

आमिर खानने करून दिले स्वतःचे इंट्रोडक्शन, फोटो शेअर करून लिहिले - माय सेल्फ लाल.. लाल सिंह चड्‌ढा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आमिर खानने फॉरेस्ट गम्पचा हिंदी रीमेक 'लाल सिंह चड्‌ढा' मधून आपला लूक शेअर केला आहे. सरदारच्या लूकमध्ये दिसत आहे अभिनेता. आमिरने फोटोसोबत लिहिले आहे, 'सत श्री अकाल जी, मैं हूं लाल... लाल सिंह चड्‌ढा.' आमिरचा हा चित्रपट ख्रिसमसला 2020 मध्ये रिलीज होणार आहे.  

'फॉरेस्ट गम्प' मधील प्रसिद्ध डायलॉग... 
या चित्रपटाचा नायक फॉरेस्ट गम्प म्हणतो, 'माझी आई नेहमी म्हणते, आयुष्य चॉकलेटच्या डब्ब्याप्रमाणे आहे.' हा संवाद आजही प्रसिद्ध असलेल्या डायलॉगपैकी आहे. हा चित्रपट 1994 मध्ये रिलीज झाला होता. आता चित्रपटाचा अभिनेता टॉम हॅन्क्स 63 वर्षांचा झाला आहे.

'फॉरेस्ट गंप' चा हिंदी रीमेक...
'लाल सिंह चड्ढा' हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप' चा अधिकृत रीमेक आहे. ओरिजनल चित्रपटात मुख्य पात्र फॉरेस्टचा मेंदू कमी काम करतो. तरीदेखील तो यश मिळवतो आणि एक ऐतिहासिक पुरुष बनतो. पण त्याचे खरे प्रेम त्याला सोडून जाते. चित्रपटाने ऑस्करमध्ये एक डजनभर नॉमिनेशन मिळवले होते आणि ऑस्कर अवॉर्ड्स जिंकले होते. टॉम हँक्स याला यासाठी सलग दुसऱ्यांदा बेस्ट अॅक्टरचा ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. चित्रपट लेखक विन्सटन ग्रूमच्या 1986 मध्ये आलेल्या नॉव्हेलवर बेस्ड होता. आमिर यामध्ये टॉम हॅन्क्सने साकारलेले पात्र पुन्हा साकारणार आहे.