आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aamir Khan Is Trying To Convince Zaira Wasim, He Is Upset Over Her Decision To Quit Bollywood

जायराच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयामुळे नाराज आहे आमिर खान, अभिनेत्रीला समजावण्याचा करत आहे प्रयत्न 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : जायरा वसीमचा बॉलीवूड सोडण्याचा निर्णय ऐकून सर्वच चकित झाले आहेत. बाॅलीवूडमध्ये तिच्या अनेक चाहत्यांनी सहानुभूती दाखवत तिच्या निर्णयाचा आदर करायला हवा, असे म्हटले आहे. मात्र सूत्रानुसार, जायराच्या या निर्णयामुळे आमिर खान नाराज झाला आहे. ताे जायराची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे ऐकले आहे. 

 

जायराला समजावण्याचा प्रयत्न करत आहे आमिर ... 
सूत्राच्या माहितीनुसार, 'जायराने हा निर्णय घाईत घेतला. ती अजून लहान आहे. या झगमगटाच्या जगात तिला मार्गदर्शन करण्यासाठी कुणी नाही. दंगलच्या वेळीदेखील झायरा खूपच अडचणीत होती. तेव्हादेखील तिला ट्रोल करण्यात आले होते. तेव्हा आमिरने तिला सांभाळले होते. आता पुन्हा एकदा आमिर तिची समजूत घालणार असल्याचे ऐकले आहे. घाईत असा कोणताही निर्णय घेऊ नये, जेणेकरून नंतर पश्चात्ताप होईल, असे आमिर तिला सांगणार आहे. आता पाहू जायरा आपला निर्णय मागे घेते की नाही. 

 

जायराने ट्विटरवर दिले स्पष्टीकरण... 
यातच जायराविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा होती. तिचे अकाउंट हॅक झाले, तिने ही पोस्ट कोणाच्या तरी दबावात टाकली, असे बरेच काही. त्यामुळे यावर जायराने खुलासा करत रविवारी एक ट्वीट केले. तिने लिहिले, माझे अकाउंट कुणी हॅक केले नाही. मी स्वत:च ते हँडल करते. हा निर्णय माझा आहे, हे मी सर्वांना सांगू इच्छित आहे. 

 

'द स्काय इज पिंक'च्या प्रमोशनमध्ये भाग घेणार नाही... 
यातच जायराने आपल्या आगामी 'द स्काय इज पिंक' च्या निर्मात्यांना चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भाग घेणार नसल्याचे सांगितले आहे. या चित्रपटात जायराव्यतिरिक्त फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रासारखे मोठे चेहरेदेखील आहेत. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. याचे प्रमोशन ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. यात जायरा सहभागी होणार नाही.