आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aamir Khan, Kareena Kapoor Starer 3 Idiots Updates On Japan Movie Theatre Last Show

जपानमध्ये बंद झाले एक सिनेमागृह, अखेरच्या शोमध्ये झळकला आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी स्टारर  'थ्री इडियट्स' या चित्रपटाच्या रिलीजला 10 वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. पण आजही त्याची लोकप्रियता कायम आहे. अलीकडेच जपानच्या ओसाका शहरातील एक थिएटर बंद झाले, पण विशेष म्हणजे तिथे अखेरच्या शोमध्ये झळकलेला चित्रपट 'थ्री इडियट्स' हा होता. शेवटचा शो हाऊस असल्याचे थिएटरकडून सांगण्यात आले. थिएटरच्या वतीने अखेरच्या शोबद्दल 29 फेब्रुवारी रोजी एक ट्वीट करण्यात आले होते. ज्यात लिहिले होते की, 'फ्यूज लाइन सिनेमाचा शेवटचा शो आज 15.30 वाजता होईल. हा शो चांगला होईल आणि त्यात  131 दर्शक असतील. हाऊसफुल आहे ... धन्यवाद. '

जगभरात पसंत केला गेलेला चित्रपट 

25 डिसेंबर 2009 रोजी थ्री इडियट्स भारतात रिलीज झाला होता आणि यात आमिर खान, आर. माधवन, शरमन जोशी, करीना कपूर, ओमी वैद्य आणि बोमन इराणी मुख्य भूमिकेत दिसले होते. जपानमध्ये हा चित्रपट 2013 मध्ये डब होऊन रिलीज झाला होता. तैवान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि चीनमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि भारताप्रमाणेच या चित्रपटाला तेथील प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळालं.

चित्रपटाची कथा कादंबरीवर आधारित 

या कॉमेडी ड्रामा चित्रपटाची कथा चेतन भगत यांच्या 'फाइव्ह पॉईंट समवन' या कादंबरीवर आधारित होती, जी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या तीन मित्रांभोवती फिरते. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय शिक्षण प्रणालीवरील दबाव दाखवण्यात आला होता. रिलीजनंतर या चित्रपटाने अनेक नवीन विक्रमाची नोंदही केली. 2009 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. 

बातम्या आणखी आहेत...