आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलीवूडमधील 'फॉरेस्ट गम्प' चा रिमेक बनवण्याची तयारी करताेेय आमिर खान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. आमिर खान आपल्या चित्रपटातील भूमिकेची खास तयारी करतो हे सर्वांनाच माहिती आहे. सध्या तो आपल्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. त्यासाठी तो फिटनेसची काळजी घेत आहे. चित्रपटात त्याला सडपातळ, तरुण आणि सुंदर दिसयाचे आहे. त्यामुळे तो खाण्याच्या बाबतीत खूपच सतर्क राहत आहे. मि. परफेक्शनिस्ट आमिर खान ज्या आगामी प्रोजेक्टसाठी काम हे करत आहे तो 1994 च्या हॉलीवुडच्या 'फॉरेस्ट गम्प' चा हिंदी रीमेक असेल. पत्रकारांनाही त्याने अलीकडेच आगामी चित्रपटाची तयार करत असल्याचेही सांगितले. 

 

कोण असेल आमिर 
तो टॉम हॅक्सची भूमिका करणार आहे. जो चित्रपटात एक साधारण माणूस आहे. 

 

का निवड केली? 
या चित्रपटात राजकारण, इतिहास, खेळ, युद्ध, वेदना, प्रेम या सर्वांचेच सुंदर मिश्रण असेल. 

 

कसा मिळाला संकेत 
आमिर खान प्रोडक्शनने गेल्या वर्षी पॅरामाउंट पिक्चर्सकडून चित्रपटाचे अधिकार घेतले. 
टॉमचा प्रभाव असे म्हटले जाते की, आमिर आधीपासूनच टॉममुळे प्रभावित आहे. त्याने अक्टिंगची लकबही टॉमकडूनच घेतली आहे. 

 

कोण असेल दिग्दर्शक 
आमिरचा पूर्वीचा व्यवस्थापक अद्वैत चंदन हा दिग्दर्शन करू शकतो. रीमेकला भारतीय संवेदना देण्यात मेहनत करणार. 

 

'फॉरेस्ट गम्प' वर एक नजर 
- ऑस्करचे डझनभर नामांकन मिळाले. 
- सहा ऑस्कर पुरस्कार मिळाले. 
- टॉमला सलग दूसरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला होता. 
- लेखक विन्सटन ग्रूमच्या 1986 मध्ये आलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आहे. 
- 60 वर्षांचे झाले आहेत टॉम हॅक्स. 
- 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता'फॉरेस्ट गम्प'. 

 

'फॉरेस्ट गम्प' चा प्रसिद्ध संवाद 
या चित्रपटाचा नायक फॉरेस्ट गम्प म्हणतो, माझी आई नेहमी म्हणते, जीवन हे चॉकलेटच्या डब्यासारखे आहे. हा संवाद आजही सर्वकालिक आहे. 

 

कथा 
यातील मुख्य पात्र फॉरेस्टचे डोके जरा कमी काम करते. मात्र, तरीही तो यशस्वी होतो व एक एेतिहासिक पुरूष बनतो. पण त्याचे प्रेम त्याला सोडून जाते. 


चित्रपटांसाठी आमिर आधीही अजब व निराळे प्रयोग करायचा 
1. गजनी 

- खूप शारीरिक मेहनत घेऊन यासाठी एट पैक एब्स बनवले. 
- 13 महिने रोज 3 तास तो व्यायाम करायचा. 
- शॉर्ट टर्म मेमरी लॉसची माहिती घेण्यासाठी त्याने अनेक रुग्णांचे निरीक्षण केले होते. 

2. दंगल 
- हरियाणाची भाषा शिकला 
- पित्याच्या भूमिकेसाठी 98 किलो वजन वाढवले. Áयुवा भूमिकेसाठी ६ महिने मेहनत घेतली. 

3. धूम 3 
- सर्कसच्या कसरती आणि जिम्नास्टिकच्या कसरती शिकल्या. 

4. पीके 
- भोजपुरी भाषा शिकला. 
- परिपूर्णतेसाठी मेहनत घेतली. 
- बॉडी लैग्वेंज एक्सपर्ट्सकडून विशेष माहिती घेऊन प्रशिक्षणही घेतले. 
- स्टंटसाठी बाइकिंग कसरती शिकल्या. 
- न्यूट्रीशियंस डाइट चार्टचा पाठपुरावा केला. 

बातम्या आणखी आहेत...