आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकलंत का... 'महाभारत'मुळे 'सॅल्यूट'करू शकला नाही आमिर खान, 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'च्या अपयशानंतर या चित्रपटावर करतोय काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आमिर खानला 'सॅल्यूट' हा चित्रपट आॅफर झाल्याची बातमी या वर्षीच्या सुरुवातीला आली होती. पण टीमबरोबर काही सर्जनशील फरकामुळे हे प्रकरण पुढे जाऊ शकले नाही. मात्र, आता आमिरने हा चित्रपट दुसऱ्या चित्रपटामुळे सोडल्याचे निश्चित झाले आहे. आता 'सॅल्यूट'मध्ये शाहरुख खान काम करणार आहे. तो 'झीरो'च्या रिलीजनंतर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये लागणार आहे. 


याबरोबरच आमिर 'महाभारत'मध्ये काम करणार असल्याची चर्चा होती, मात्र त्याने कधीच याविषयी निश्चित सांगितले नाही. नुकतेच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात त्याला विचारण्यात आले, तुझा आगामी प्रोजेक्ट 'महाभारत' असेल का? तर तो म्हणाला, पुढचा चित्रपट कोणता करणार हे अजून मी ठरवले नाही. याच कार्यक्रमात हजर असलेले सॅल्यूटचे लेखक अंजुम राजाबलीने सांगितले, आमिर 'महाभारत'च्या प्री-प्रॉक्डशनमध्ये इतका व्यग्र होता की, त्याला सॅल्यूट सोडावा लागला. 

 

अंजुम पुढे म्हणाले, मी या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होतो. खरं सांगायचे झाले तर यात आमिर काम करणार असल्यामुळे आनंद होतो. त्याला संकल्पनादेखील आवडली होती. आम्ही याविषयी चर्चादेखील केली होती. मात्र, दुर्दैवाने महाभारताने त्यांचा पूर्ण वेळ घेतला. 

 

अंजुमची अशी प्रतिक्रिया ऐकून कार्यक्रमाला हजर आमिरला खूप आश्चर्य वाटले. खरं तर, आमिर महाभारताचा विषय कधीच सार्वजनिक करू इच्छित नव्हता. यानंतर आमिरने सॅल्यूटविषयी सांगितले, सॅल्यूट एक चांगला चित्रपट आहे. मी राकेश शर्मा (अंतराळवीर- यांच्यावर तो आधारित आहे) चा चाहता आहे. ही खूपच चांगली कथा आहे. हा चित्रपट करण्यास मी समर्थ नव्हतो, याचे मला दु:ख वाटते. त्यामुळे मी शाहरुखला फोन केला आणि त्याला या चांगल्या कथेविषयी सांगितले. शाहरुखने ती कथा एेकली ती त्याला आवडलीदेखील. मी त्याला या चित्रपटाबद्दल शुभेच्छा देतो. 

बातम्या आणखी आहेत...