आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aamir Khan Wife Kiran Rao Slip At Airport Coming From Ambani Daughter Engagement

अंबानींच्या मुलीच्या साखरपुड्याहून परतताना एअरपोर्टवर पडली आमिर खानची पत्नी, जान्हवी-खुशी दिसल्या एकत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः इटलीतील लेक कोमो येथे बिझनेसमन मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीचा साखरपुडा झाला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या काळात लेक कोमो येथे होते. आता हे सर्व सेलिब्रिटी मुंबईत परतत आहेत. रविवारी रात्री अभिनेता आमिर खान पत्नी किरण रावसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसला. दोघेही एकमेकांचा हात पकडून एअरपोर्टबाहेर पडत होते. पण अचानक किरणचा बॅलेन्स बिघडला आणि ती पडली. पडताना किरण जोरात ओरडली. आमिरने लगेचच तिला सावरले. आमिर-किरणला बघून चाहत्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. दोघेही घाईघाईत आपल्या गाडीच्या दिशेने गेले. आमिरच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' हा त्याचा आगामी चित्रपट असून यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. 


जान्हवी-खुशी दिसल्या एकत्र... 
- ईशा अंबानीच्या साखरपुड्यात जान्हवी आणि खुशी कपूर यादेखील सहभागी झाल्या होत्या. या दोघीही रविवारी इटलीहून मुंबईत परतल्या. एअरपोर्टवर दोघी बहिणींनी सारखे स्वेटशर्ट घातले होते. दोघीही एकमेकींचा हात पकडून दिसल्या. 

- जान्हवीच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे म्हणजे, 'तख्त' हा तिचा आगामी चित्रपट असून करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. जान्हवीने याचवर्षी 'धडक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...