आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क: विनेश फोगटने 2018 च्या एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. विनेशच्या या यशानंतर देशातील अनेक सेलिब्रिटीजने विनेशवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये आमिर खानही मागे नाही. आमिरने आपल्या अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या. आमिरने लिहिले की, म्हारी छोरिया छोरो से कम है के. यावर महावीर फोगाटने आमिर यांना शानदार रिप्लाय दिला.
महावीर फोगाट यांचा वेगळा अंदाज
आमिरच्या ट्वीटवर महावीर फोगाट म्हणाले की, म्हारी छोरिया छोरो से चार कदम आगे है जी. यापुर्वी महावीर यांनी विनेशला शुभेच्छा देत ट्वीट केले की, 'वाह विनेश, जीत लिया तनै गोल्ड अर दिल'
- महावीरने विनेशला एक मॅसेज देत लिहिले आहे की, एक बात याद रखना बेटी, गोल्ड जीती तो मिसाल बन जाएगी, और मिसालें दी जाती हैं भुलाई नहीं जाती।
फोगट सिस्टर्सचा बायोपिक आहे दंगल
आमिर खानने महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता और बबीता फोगट यांच्यावर बायोपिक बनवला होता. यामध्ये त्याने महावीर फोगटची भूमिका साकारली होती. एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकणारी विनेश फोगट महावीर फोगट यांची पुतणी आहे.
- विनेश फोगटला 50 KG फ्री स्टाइल वीमन रेसलिंगमध्ये गोल्ड मिळाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.