आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aamir Khan's Daughter Ira And Varun Dhawan's Niece Anjani Are Making Their Bollywood Debut

आमिरची मुलगी इरा आणि वरुणची पुतणी अंजनी करत आहेत बॉलिवूडमध्ये पदार्पण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलीवूडमध्ये सध्या स्टार किड्स पदार्पण करताना दिसत आहेत. या वेळी दोन पदार्पण करणार आहेत. एक स्टार किड आमिर खानची मुलगी इरा खान आणि दुसरी वरुण धवनची पुतणी अंजिनी धवन आहे. दोघींची पदार्पणाची चर्चा सुरू आहे. एकीकडे इरा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे, तर अंजिनी अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. 
 

अनेक शहरांत होईल शोचा प्रीमियर
इरा लवकरच एका नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे. त्याचे नाव ‘युरिपायड्स मेडिया’ असे आहे. या नाटकाची कथा ग्रीस मायथॉलॉजीवरून घेण्यात आली आहे. यात जादुई कथा दाखवण्यात येणार आहे. या नाटकाचा प्रीमियर डिसेंबरमध्ये होईल. इराने या नाटकावर अनेक महिने संशोधन केले आहे. या नाटकाचा प्रीमियर भारताच्या अनेक शहरांत होईल याचा सराव लवकरच मुंबईत सुरू होणार आहे.
 

वरुण धवनची पुतणी अंजिनी धवन बॉलीवूडसाठी तयार होत आहे...
दुसरीकडे वरुण धवनची पुतणी अंजिनी धवन अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. सूत्रानुसार, अंजिनी सध्या लहान आहे आणि अभ्यास करत आहे. मात्र, ती बॉलीवूडमध्ये काम करणार आहे, हे निश्चित आहे. तिने यासाठी प्रशिक्षण घेणेदेखील सुरू केले आहे. ती सध्या अभिनय आणि डान्स शिकत आहे. शिवाय ती कुली नंबर १ च्या सेटवर डेव्हिड धवनला सहकार्यदेखील करत आहे.

बातम्या आणखी आहेत...