आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानचा नवीन लूक झाला व्हायरल, जैसलमेरच्या शूटिंग सेटवरुन लीक झाला फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातील नवीन लूक समोर आला आहे. तुर्कीत राहणा-या आमिरच्या एका चाहत्याने आमिरचा जैसलमेरच्या शूटिंग सेटवरुन हा फोटो शेअर केला आहे. फोटोत आमिर वाढलेले केस आणि दाढीत दिसतोय. त्याने डोक्यावर टोपी घातली आहे. हा चित्रपट 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूडपटाचा अधिकृत रिमेक आहे. सध्या जैसलमेर येथे 'लाल सिंह चड्ढा'चे  शूटिंग सुरु आहे. चित्रपटात आमिरसह करीना कपूर मेन लीडमध्ये आहे. 


काही दिवसांपूर्वी आमिरने  'लाल सिंह चड्ढा'चा फर्स्ट लूक रिलीज केला होता. शेअर केलेल्या पोस्टमध्ये आमिर सरदारच्या रुपात दिसला होता. तर आला लीक झालेल्या फोटोत तो वाढलेल्या दाढी आणि केसांमध्ये दिसतोय. 

'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक..
'लाल सिंह चड्ढा' हॉलिवूड 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हॉलिवूडपटात चित्रपटातील मुख्य पात्र फॉरेस्टचा मेंदू कमी काम करतो. पण तरीदेखील तो एक यश मिळवतो आणि ऐतिहासिक पुरुष बनतो. या चित्रपटाला ऑस्करमध्ये एक डझनहून अधिक नॉमिनेश मिळाले होते आणि सहा ऑस्कर अवॉर्ड्स चित्रपटाने आपल्या नावी केले होते.  टॉम हँक्सला या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचा दुसरा ऑस्कर मिळाला होता.  हा चित्रपट लेखक विन्सटन ग्रूम यांच्या 1986 मध्ये आलेल्या कांदबरीवर आधारित होता. हिंदी रिमेकमध्ये आमिर टॉम हँक्सने साकारलेली व्यक्तिरेखा साकारणार आहे.