आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारतात \'कृष्ण\' बनणार आमिर खान, ओशोच्या बायोपिकवरील काम थांबवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. ठग्ज ऑफ हिन्दोस्तानच्या अपयशानंतर आमिर खान आता आपला ड्रीम प्रोजेक्ट महाभारतवर काम करणार आहे. या चित्रपटात तो कृष्णाची भूमिका साकारणार आहे. आमिरने चित्रपटाची तयारीही सुरु केली आहे. अशा वेळी गुरु ओशोचा बायोपिक टाळण्यात आला आहे. हा चित्रपट शकुन बत्रा डायरेक्ट करणार होते आणि करण जोहर हा चित्रपट प्रोड्यूस करणार होता. चित्रपटामध्ये आलिया भट आनंद शीलाची भूमिका साकारणार होती. 

 

रामचरितमानसमधूनही इनपुट घेत आहे रिसर्च टीम 
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाभारत चित्रपट तीन-चार भागांमध्ये तयार केला जाणार आहे. यासाठी रिसर्च टीम रामचरितमानसमधून महाभारताचे इनपुट घेत आहे. यासोबतच मॉर्डन इंटरप्रिटेशनसाठी कोलकाताच्या एका लेखकाच्या पुस्तकाची मदत घेत आहे. 
- कोलकात्याच्या त्या लेखिकेने द्रोपदीच्या नजरेतून महाभारताची व्याख्या केली आहे. ते पुस्तक आमिरला खुप आवडले होते. चित्रपटाची कथा त्या पुस्तकावर आधारित आहे. महाभारतचे डायरेक्टर चंद्रप्रकाश द्विवेद्वी आणि अंजुम राजाबलीलाही बोर्डवर घेण्यात आले आहे. 

 

13 वर्षांत पहिल्यांता अयशस्वी ठरला आमिरचा चित्रपट 
- आमिर खानला गेल्या 13 वर्षांत पहिल्यांदाज 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तान' चित्रपटामुळे अपयशाचा सामना करावा लागला. यामुळे आता त्याच्या कोर क्रिएटिव्ह टीमला आगामी प्रोजेक्टची स्क्रिप्ट विचार करुन निवडण्याचे आदेश देण्यात आले आहे. आमिरचा माजी मॅनेजर आणि सीक्रेट सुपरस्टारचे डायरेक्टर अव्दैत चंदन यांना फॉरेस्ट गम्पच्या हिंदी रीमेवर काम करण्यात सांगितले आहे. 


- मूळ चित्रपटातून टॉम हँक्सला खुप लोकप्रियता आणि ऑस्कर अवॉर्डही मिळाला होता. आमिरने या चित्रपटाचा रीमेक बनवण्याचे राइट्स घेतले होते. आता स्क्रिप्ट भारतीय पध्दतीने तयार केली जात आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...