आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • AAP Candidate Santosh Magar's Declaration In Pratur Constituency Is Being Discussed In Front Of Every Voters.

निवडणुकीतील अजब फंडा; परतूर मतदार संघातील 'आप'चे उमेदवार संतोष मगर यांच्या जाहीरनाम्याची चर्चा, प्रत्येक मतदारांसमोर केले जातेय वाचन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपचे उमेदवार संतोष मगर. - Divya Marathi
आपचे उमेदवार संतोष मगर.

आशिष गारकर

परतूर- निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार कोणती शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. परतूर विधानसभा मतदार संघात आम आदमी पार्टी कडून निवडणूक लढवणारे संतोष मगर यांनी शोधून काढलेली शक्कल सबंध मतदार संघात चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनी आपला जाहीरनामा चक्क बाँड पेपरवर नोटरी करून मतदारांकडे सुपूर्द केला आहे. गावागावात जाऊन ते आपला जाहीरनामा मतदारांना पटवून सांगत आहेत.  विशेषतः युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपण हा जाहीरनामा प्रसिद्ध केला असल्याचे ते सांगतात.


मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल अशा मुद्द्यांवर विकासात्मक दृष्टीकोन घेऊन आपण निवडणूक लढवत असल्याचे ते सांगतात. सुशिक्षित बेरोजगारांना मासिक 6 हजार रुपये भत्ता, दिल्ली सरकारच्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांचा विकास, महापरीक्षा पोर्टल बंद करून करून सरकारी नोकर भरतीसाठी पारदर्शक यंत्रणा विकसीत करण्यासाठी शासनावर दबाव निर्माण करणार यांसह स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात विविध दहा ते पंधरा प्रमुख मुद्द्यांचा समावेश त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. निवडणून आल्यानंतर माझ्याकडून जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार मी मतदार संघातील सर्व जनतेला देत असल्याचे त्यांनी नोटरी केलेल्या जाहीर नाम्यात नमूद केले आहे.

आश्वासने निवडणुकीनंतर कितपत पूर्ण होतात
 
निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्ष, संघटना अनेक आश्वासने, प्रलोभने मतदारांना देत असतात, निवडणुकीनंतर ती कितपत पूर्ण होतात हा संशोधनाचा विषय ठरावा मात्र, निवडणुकीच्या आधीच निवडून आल्यानंतर कोणती कामे करणार हे बाँड पेपरवर लिहून देणारा हा उमेदवार कदाचित पहिलाच असावा. याबाबत मतदारसंघात मात्र चर्चेला उधाण आले आहे.आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या
 
परतूर विधानसभा मतदारसंघात आता प्रचारानिमित्त आयोजित कॉर्नर बैठका, संवाद दौरे, जाहीर सभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. यामुळे मतदारांना मात्र करमणूक होत आहे. परतूर मतदारसंघात 14 उमेदवार निवडणुक रिंगणात असले तरी खरी लढत महायुतीचे बबन लोणीकर आणि काँग्रेस आघाडीचे सुरेश जेथलिया यांच्यात होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...