Home | Maharashtra | Vidarva | Akola | AAP leader Mukim Ahmed and Qadri murdered in akola

आप नेते मुकीम अहमद आणि कादरींचे अपहरण करून हत्या, अकोल्यातील घटनेने खळबळ

प्रतिनिधी | Update - Aug 05, 2018, 10:53 AM IST

आम आदमी पार्टीचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर (५४, रा. केदारनंदा अपार्टमेंट, अकोला) व शेख शफी शेख कादरी (३५, रा. साखरखेर्

  • AAP leader Mukim Ahmed and Qadri murdered in akola

    अकोला - आम आदमी पार्टीचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर (५४, रा. केदारनंदा अपार्टमेंट, अकोला) व शेख शफी शेख कादरी (३५, रा. साखरखेर्डा, जि. बुलडाणा) यांचे ३० जुलै रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे मृतदेह पोत्यात बांधून बुलडाणा जिल्ह्यातील पाथर्डी गावानजीक जंगलामध्ये निर्जनस्थळी १०० फूट खोल दरीत फेकून देण्यात आल्याचे शनिवारी समोर आले. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    मुकीम अहमद व त्यांचे सहकारी शेख शफी शेख कादरी हे ३० जुलै रोजी त्यांचे मित्र आझाद कॉलनीतील तसब्बूर कादरी यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरात मुकीम अहमद व शेख शफी कादरी यांना गळफास देऊन संपण्यात आले. नंतर त्यांचे मृतदेह पोत्यात भरून चारचाकी वाहनाने मेहकरच्या दिशेने रवाना करण्यात आले. निर्मनुष्य ठिकाणी पाथर्डी गावाजवळ १०० फूट दरीत त्यांचे मृतदेह फेकण्यात आले. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

    हत्येमागे पैशाचा पाऊस पाडण्याचे कारण?
    स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांनी तसब्बूर कादरी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी मो. तसब्बूर कादरी, जब्बारखाँ सत्तारखाँ (रा. वाकद, जिल्हा बुलडाणा), अस्लम शेख स. हुसेन (रा. वाकद), शेख मुख्तार शेख नूर (रा. मेहकर), शब्बीरशहा अन्वरशहा (रा. खाकडी, जि. बुलडाणा), संदीप आत्माराम दातार (रा. जानेफळ) आणि शेख इम्रान शेख कदीर (रा. मेहकर) यांना ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडाला पैशाचा पाऊस पाडण्याचे कारण असल्याचे समोर येत आहे.

Trending