आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AAP आमदाराला 6 महिन्यांची कैद, 2 लाखांचा दंडही ठोठावला; 4 वर्षांपूर्वी लावलेल्या आरोपात झाली शिक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार सोम दत्त यांना येथील एका न्यायालयाने 6 महिन्यांची कैद गुरुवारी सुनावली आहे. एवढेच नव्हे, तर या आमदारांना 2 लाख रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत दिल्लीतील स्थानिक कोर्टाने सोम दत्त यांना मारहाण आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोषी ठरवले होते. त्याच प्रकरणात आमदाराला आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाच्या 2 लाखांपैकी 1 लाख रुपये मारहाण झालेल्या व्यक्तीला दिली जाणार आहे.


काय आहे प्रकरण?
हे प्रकरण जानेवारी 2015 चे आहे. त्यावेळी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता. याच दरम्यान संजीव राणा नावाच्या एका व्यक्तीने आप नेते सोम दत्त यांच्यावर आरोप केला होता. पीडित संजीव राणा यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी प्रचारादरम्यान सोम दत्त आपल्या 50 समर्थकांसह परिसरात फिरत होते. त्यांनी संजीव यांच्या घराची बेल वाजवली. दार उघडले नाही तेव्हा पुन्हा-पुन्हा बेल वाजवणे सुरूच ठेवले. या गोष्टीवरून संजीव आणि आप नेत्याच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि सर्वांनी मिळून संजीवला रस्त्यावर ओढून आणले. यानंतर बेसबॉल बॅट, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत संजीवला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


संजीव भाजपचा सदस्य, आरोप खोटे -सोम दत्त
तर दुसरीकडे, संजीव राणाने लावलेले आरोप आप आणि आमदार सोम दत्त यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले होते. कोर्टात सोम दत्त यांनी दिलेल्या जबाबानुसार, संजीव हा भाजपचा सदस्य आहे. त्याने मुद्दाम सोम दत्त यांचे तिकीट रद्द करण्यासाठी खोटे आरोप केले होते. परंतु, कोर्टात सोम दत्त यांचा दावा फेटाळण्यात आला आणि त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.