नवी दिल्ली- इन्फोसिसचे माजी सीएफओ व्ही. बालाकृष्णन आणि मोदींची पोलखोल करणारे पत्रकार आशिष खेतान यांच्यासह 60 उमेदवारांची चौथी यादी आज (सोमवार) आम आदमी पक्षाने जाहीर केली.
आशिष खेतान नवी दिल्ली मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक 'आप'च्या तिकीटावर लढविणार आहेत. खेतान तहेलकाचे माजी पत्रकार असून gulail.com या न्युज पोर्टलचे संस्थापक आहेत. गुजरात पोलिसांनी एका महिलेची हेरगिरी केल्याच्या प्रकरणाला त्यांनी वाचा फोडली होती. यानंतर नरेंद्र मोदी बरेच अडचणीत सापडले होते.
कर्नल देवेंद्र सेहरावत यांना 'आप'ने दक्षिण दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली आहे. भागवत मान यांना पंजाबमधील संगरूर येथून उमेदवारी मिळली आहे. यापूर्वी ते मनप्रित बादल यांच्या पिपल्स पार्टी ऑफ पंजाबमध्ये होते. 'आप'च्या चौथ्या यादीत दिल्लीतील 2, हरियाणा येथील 4, कर्नाटकमधील 13 आणि उत्तर प्रदेशातील 38 उमेदवारांचा समावेश आहे.