आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AAP च्या तिकीटासाठी एका व्यक्तिने पाठवला तब्बल 45 कोटींचा चेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाच्या उमेदवारीसाठी एका व्यक्तिने तब्बल 45 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. उमेदवारी देऊन पक्षाच्या निधीत ही रक्कम जमा करावी, असे या व्यक्तिने सांगितले आहे. याचा पुरावा म्हणून या व्यक्तिने 45 कोटी रुपयांचा चेक पाठवला आहे. दरम्यान, आपने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. ही व्यक्ति कोणती आणि तिला कोठून तिकीट हवे आहे, याची माहिती 'आप'कडून देण्यात आलेली नाही. या प्रस्तावावर जेव्हा निर्णय घ्यायचाच नाही, तर त्यावर विचार का करावा, असे 'आप'ने सांगितले आहे.
'आप'ची स्थापना झाली तेव्हापासून या पक्षाला एकूण 35 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पैसे देऊन किंवा बाहुबल वापरून तिकीट मिळविण्याच्या विचारांना 'आप'चा विरोध आहे, असे पक्षाने सांगितले आहे. चेक स्वीकारला नाही तर तीन महिन्यांनी तो आपोआप रद्द होईल म्हणून 'आप'च्या कार्यालयात चेक ठेवला असल्याचे सांगण्यात आले आहे. नुकतेच एका व्यक्तिने 'आप'ला उत्तर प्रदेशातून तीन तिकीट मागितल्या होत्या. याऐवजी पक्षाला दोन कोटींचा निधी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
भाजपचे भोपाळचे तिकीट एक कोटीला, कॉंग्रेसचा आरोप...वाचा पुढील स्लाईडवर