आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षांची झाली आराध्या, मुलीचा वाढदिवस साजरा करताना अभिषेक म्हणाला - अशीच निरागस राहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या 7 वर्षांची (16 नोव्हेंबर) झाली आहे. बच्चन कुटूंबाने आराध्याचा वाढदिवस तिच्या फ्रेंड्ससोबत साजरा केला. बांद्रा येथील एका रेस्तरॉमध्ये आयोजित केलेल्या या पार्टीमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि श्वेता नंदा उपस्थित होते.


सोशल मीडियावर ट्रोल झाली ऐश्वर्या 
पार्टीमध्ये पोहोचण्यापासून सेलिब्रेशनपर्यंत ऐश्वर्याने लेकीचा हात पकडलेला होता. तिचे हो फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक कमेंट्स येत आहेत. एक यूजरने ऐश्वर्याला प्रश्न केला की, प्रत्येक वेळी मुलीचा हात पकडून असते, ती कुठे जाणार नाही. बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आराध्याने येलो-गोल्डन कलरचा फ्रॉक घातला होता. यासोबतच मॅचिंग हेयरबँडही लावला होता. तर ऐश्वर्या ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. तिने टॉपसोबत गोल्डन ब्लेजर घातला होता. 

 

अभिषेकने अशा दिल्या शुभेच्छा 
अभिषेक बच्चनने लेकीला विश करताना आपल्या इंस्टाग्रामवर एक पेटिंग शेअर केली. या पेटिंगमध्ये त्याच्यासोबत मुलगी आणि ऐश्वर्याही दिसत आहे. यावर अभिषेकने "वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा लिटिल प्रिंसेस, तु कुटू्बाचा गौरव आणि आनंद आहेस. नेहमीच अशी हसत राहावे आणि निरागस रहावे अशी मी प्रार्थना करतो, तुझ्यावर मनापासून प्रेम करतो" असे कॅप्शन दिले. 


बिग बीने लिहिला ब्लॉग 
आजोबा अमिताभ बच्चन यांनी नात आराध्याला ब्लॉग लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, आज कु या जगात आली होतीस. नातीसोबत घरच्यांचा आशीर्वाद नेहमीच आहे. तु आनंदात आणि शानमध्ये दिर्घायुषी होवो.

 

 

बातम्या आणखी आहेत...