Home | National | Delhi | aarushi talwar murder supreme court admits cbi appeal against release parents

आरुषी हत्याकांड : तलवार दांपत्याच्या सुटकेविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

वृत्तसंस्था | Update - Aug 10, 2018, 09:13 PM IST

राजेश व नूपुर तलवार यांची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमत झाले आहे.

  • aarushi talwar murder supreme court admits cbi appeal against release parents

    नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालय २००८ मध्ये गाजलेल्या आरुषी व हेमराज हत्याकांड प्रकरणातील आरोपी दंतवैद्य दांपत्य राजेश व नूपुर तलवार यांची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमत झाले आहे. न्या. रंजन गोगाई, नवीन सिन्हा आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने शुक्रवारी म्हटले, सीबीआयच्या अर्जावर हेमराजची पत्नी खुमकला बंजाडे यांच्या प्रलंबित याचिकेसोबत सुनावणी घेईल.

    गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने तलवार दांपत्याची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर हेमराजच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीबीआयने ८ मार्च रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.


    मे २००८ मध्ये १४ वर्षीय आरुषी तलवार ही तरुणी नोएडा येथील तिच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तिचा गळा कापण्यात आला होता. हत्येचा संशय घरातील नोकर हेमराजवर झाला होता. परंतु दोन दिवसांनंतर त्याचाही मृतदेह तलवार दांपत्याच्या घराच्या छतावर आढळला होता. गाझियाबाद येथील सीबीआयने न्यायालयाने तलवार दांपत्यास २६ नोव्हेंबर २०१३ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली होती.

Trending