आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई. 'आशिकी-2' आणि 'पीके' सारख्या चित्रपटांसाठी गाणे गायलेला सिंगर आणि म्यूझिक कंपोजर अंकित तिवारी बाबा झाला आहे. अंकितची पत्नी पल्लवी शुक्लाने मुलीला जन्म दिला आहे. या कपलने मुलीचे नाव आर्या तिवारी ठेवले आहे. एका एन्टटेन्मेंट साइटला दिलेल्या मुलाखतीत अंकितने सांगितले, "बाबा होण्याची फिलिंग शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मुलीला कडेवर घेणे ही माझ्या आयुष्यातील बेस्ट मोमेंट आहे. माझे कुटूंब कंम्पलीट झाले आहे. विशेष म्हणजे मुलीला जन्म दिल्यानंतर पल्लवी फिट आहे." अंकितने 10 महिन्यांपुर्वी 23 फेब्रुवारी 2018 ला मॅकेनिकल इंजीनियर पल्लवीसोबत लग्न केले होते.
आज्जीला रेल्वेत मिळाली सुन...
- मीडिया रिपोर्टनुसार, अंकितची आज्जी रामकुमारी तिवारी यांना पल्लीवी शुक्ला एका रेल्वे प्रवासादरम्यान भेटली होती. दोघी एकाच कोचमध्ये होत्या. या दरम्यान गप्पा मारताना आजीला पल्लीवी एवढी आवडली की त्यांनी तिच्या कुटुंबीयांशी लग्नाची बोलणी केली. हे लग्नाची बोलणे पुढे वाढले आणि अंकितचे लग्न पल्लवीशी ठरले.
- एका इंटरव्यूमध्ये अंकितने सांगितले होते, माझ्या आईने सांगितले की, पल्लवीच आपली सुन होईल. तिच्या निर्णयावर सर्वांनी सहमती दर्शवली. मी देखील आनंदी आहे, की कुटुंबीयांना पल्लवी पसंत आहे. पल्लवी एक सामान्य मुलगी आहे. जेव्हा आमची पहिली भेट झाली तेव्हा 10 लोक सोबत होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.