आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुला पाहते रे'नंतर आता या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आशुतोष, सांगितले सध्या तो काय करतोय... 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशुतोष कुलकर्णी आणि 'रंग माझा वेगळा' या मालिकेतील अभिनेत्री रेशमा शिंदे - Divya Marathi
आशुतोष कुलकर्णी आणि 'रंग माझा वेगळा' या मालिकेतील अभिनेत्री रेशमा शिंदे

'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता आशुतोष गोखले आता काय करतोय हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल ना... तर याचे उत्तर स्वतः आशुतोषने दिले आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या नवीन मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. 'रंग माझा वेगळा' हे त्याच्या नव्या मालिकेचे नाव आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. या  मालिकेतून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'तुला पाहते रे'या मालिकेत जयदीप ही व्यक्तिरेखा आशुतोषने साकारली होती.  त्याची भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. आता तो नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटणार आहे. रंग माझा वेगळा या मालिकेचा प्रोमो शेअर करुन आशुतोषने लिहिले, “सध्या काय करतोयस?”... “काय मग, काय चाललंय?”.... “काय नवीन?”... या व यासारख्या सगळ्या प्रश्नांवर हेच उत्तर! . रंग माझा वेगळा..."" आशुतोष हा प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे. 

या मालिकेतील नायिका म्हणजेच दिपाच्या वेगळेपणाच्या प्रेमात तुम्ही नक्कीच पडाल. स्वत:वर भरभरुन प्रेम करणारी दिपा तिच्या गुणविशेषांमुळे प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. दिपाचा हाच वेगळेपणा ‘सौंदर्य म्हणजे गोरेपणा’ ही भ्रामक समजूत असल्याची जाणीव करुन देतो. सौंदर्याची नेमकी व्याख्या काय याचा नव्याने विचार करायला भाग पाडतो. आशुतोषसोबत रेशमा शिंदे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत आणि अतुल केतकर यांच्या राईट क्लिक प्रॉडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. येत्या 30 ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री साडे नऊ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.