आयुष शर्मा म्हणाला / आयुष शर्मा म्हणाला - 'सलमान खानजवळ त्याच्या बहिणीचा हात मागताना मला घाम फुटला होता'

Aug 31,2018 02:12:00 PM IST

मुंबईः अभिनेता सलमान खान त्याची लाडकी बहीण अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा यांची नेहमीच काळजी करत असतो. त्याने अर्पिताच्या पसंतीने आयुषला पहिल्या भेटीतच पसंत केले होते. अर्पिताचा पती आयुष लवकरच सलमानच्या होम प्रॉडक्शनच्या लव रात्री या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. यानिमित्ताने त्याच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्याच्या आणि अर्पिताच्या नात्याबाबत सलमानचा दृष्टिकोन कसा असतो, हेदेखील त्याने सांगितले.

अर्पिताचा हात मागण्याची हिंमत झाली नव्हती...
सलमान खान भलेही स्वत: लग्न करू शकला नाही, पण तो इतर कुणाच्या लग्नामध्ये कधीच आडकाठी आणत नाही. बहीण अर्पिताची तो खूप काळजी करत असतो. पहिल्याच भेटीत सलमानने आयुषला लग्नासाठी होकार दिला होता. यासंदर्भात आयुष सांगतो, 'सुरुवातीला 'भाई' दुसऱ्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल नकारात्मक विचार करतो. माझ्या बाबतीत तो साक्षात भाई होता. त्याच्या बहिणीचा हात मागण्यासाठी चर्चा करण्यास माझी सुरुवातीला हिंमतच झाली नाही. तरीदेखील मी डेअरिंग केली आणि माझी भीती दूर झाली. पहिल्या भेटीतच त्यांनी नातेसंबंधांसाठी होकार दिला. ते म्हणाले होते, 'तुम्ही तरुण वयात लग्न करण्याचा निर्णय घेत असाल तर काहीच अडचण नाही. मात्र, विवाह केला तर नाते चांगल्या रीतीने टिकवले पाहिजे.' सलमानमुळेच माझी आणि अर्पिताची लव्ह लाइफ गुळगळीत राहिली, असेही आयुष म्हणाला.

अर्पिताबाबत आयुष म्हणाला...
अर्पिता वायफळ गोष्टींसाठी हट्ट करत नाही. तिचे मन जिंकण्यासाठी फक्त तिला कॉफी पाजावी लागते. तिच्या खूप कमी मागण्या असतात. शॉपिंगबाबतही तिच्यामध्ये कोणताच क्रेझीनेस नाही. आम्ही दोघेही एकमेकांना लग्नाच्या चार वर्षांपूर्वीपासून ओळखतो. आम्हा दोघांच्याही एका मैत्रिणीच्या माध्यमातून आमची भेट झाली होती. आम्ही चार वर्षांपर्यंत मित्र म्हणून राहिलो. यादरम्यान आम्ही एकमेकांसाठीच जन्मलो आहोत, याची जाणीव झाली. एकेदिवशी मी अर्पिताला लग्नासाठी प्रपोज केले.'

X