आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या खेळाडूने क्रिकेटसाठी शिक्षण सोडले, एकाच सिरीजमध्ये ७६९ धावा करून ब्रॅडमनचे रेकॉर्ड तोडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> नाव - स्टीव्ह स्मिथ > व्यवसाय- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर > एकूण संपत्ती - १४० कोटी त्यांच्याबाबत यासाठी हे वाचा- स्टीव्हने अॅशेस सिरीजच्या पहिल्या दोन कसोटीमध्ये शतक झळकावून रेकाॅर्ड केला.    ५ फूट ९ इंच उंचीचा एक  असा खेळाडू जो ‘ईंट का जवाब पत्थर’ने देऊन आपल्या प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीत करतो. असा एक धुरंधर बॅट्समन जो कसोटी सामन्यात नेहमीच अव्वल राहिला आहे. क्रिकेटच्या वेडामुळे त्यांना शाळा सोडण्याची वेळ आली होती. ते बालपणी फारच भित्रे होते म्हणून मित्र त्यांची चेष्टा करत असत.  स्टीव्ह स्मिथचे पूर्ण नाव स्टीव्हन पीटर डेवरो स्मिथ आहे. त्यांचा जन्म २ जून १९८९ मध्ये सिडनी, ऑस्ट्रेलिया मध्ये झाला होता. वडील पीटर आणि आई  जिलियन स्मिथ ही युरोपियन आहे. त्यांच्या वडिलांकडे रसायन शास्त्राची डिग्री आणि ते रंग आणि मेणाशी संबंधित काम करत असत. सुरुवातीपासूनच स्मिथला क्रिकेट फारच आवडायचे. ते लहानपणापासूनच टीव्हीवर क्रिकेट पाहात असत. त्यांच्या वडिलांनाही त्याची आवड होती. आपल्या मुलाने क्रिकेटर बनावे, असे त्यांना वाटत होते. यासाठी त्यांनी त्याला तसे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. स्मिथने मेनाई हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि शिक्षणावर लक्ष देण्याचा प्रयत्न केला. पण लवकरच त्यांची निवड अंडर ८ च्या टीममध्ये झाली आणि पहिला सीझन वयाच्या सहाव्या वर्षीच खेळण्याची संधी मिळाली. त्यांच्या क्लबचे नाव ‘आयलावाँग क्रिकेट क्लब’  होते ज्याला आयलावाँग मेनाइ क्रिकेट क्लब असे म्हटले जात होते. छोट्या वयात स्मिथचा सुंदर खेळ पाहून त्यांच्या सोनेरी भविष्याचा सर्वांना अंदाज आला होता.  त्यांच्या वडिलांनी  स्मिथला वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत स्वत:च प्रशिक्षण दिले. पण यानंतर अन्य काही लोक मदतीला आले आणि त्यांनी आधिक चांगले प्रशिक्षण देण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा वडिलांनी ही जबाबदारी प्रोफेशनल ट्रेनर्सकडे दिली आणि त्यानंतर ते फक्त मागून प्रोत्साहनच देऊ लागले.  स्मिथच्या प्रशिक्षणाच्या वेळी सर्वात मोठी मदत झाली फिल जॅक्स यांची.  फिलच्या निगराणीत  स्मिथने बरीच मेहनत केली आणि क्रिकेट स्टार बनण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू केले. पण आता यात शिक्षण आडवे आले. त्यांचे लक्ष धड शाळेत लागेना आणि धड करिअरकडे लागेना. मार्कही कमी मिळू लागले. शेवटी शाळा सोडून त्यांनी पूर्ण लक्ष क्रिकेटवर देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचे वय फक्त १७ होते. २४ जानेवारी २००८ रोजी त्यांना पश्चिम ऑस्ट्रेलियाशी खेळण्याची संधी मिळाली आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्यांची सुरुवात झाली. फलंदाजीबरोबर गोलदंाजीतही त्यांनी प्रावीण्य दाखवून सर्वांनाच हैराण केले. पदार्पणातच त्यांनी ३३ धावा केल्या. २००८ केएफसी बिग बॅश  टुर्नामेंटमध्ये १५ धावा देऊन ४ गडी बाद केले. त्यांच्या खेळाने प्रेक्षकाचे डोळे दिपून गेले. त्यांची आई इंग्लंडची होती आणि वडील ऑस्ट्रेलियन होते. अशा वेळी त्यांच्यामसेार दोन पर्याय होते. इंग्लंडकडून खेळायचे की ऑस्ट्रेलियाकडून? बराच विचार करून त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे इंग्लंडने एक चांगला खेळाडू गमावला.   फेब्रुवारी २०१० मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने पाकिस्तान विरुद्ध  २०:२० सामन्यात खेळ करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाऊल टाकले. त्याच महिन्यात पहिला एकदिवसीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला.  सुरुवातीला तेे लेग स्पिन बॉलिंग  करत होते. त्यांची तुलना नेहमीच करते शेन वॉर्न याच्याशी होत होती. स्टीव्ह स्मिथ जेव्हा अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आले तेव्हा ते फार घाबरलेले होते. वय फक्त २० होते आणि उंची कमी होती. सोशल मीडियात त्यांची चेष्टा केली जात असे.  ड्रेसिंग रूममध्ये खेळाडू त्यांना चिडवायचे. पण त्यांचा खेळ नेहमीच चांगला असल्याने विरोधकांची तोंडे बंद होत असत.  आज ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीममध्ये त्यांना मोठा मान आहे. २०१४ मध्ये  त्यांना ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा  कप्तान  बनविले गेले. डॉन ब्रॅडमनच्या एकाच सिरीजमध्ये  ७१५ धावांचे रेकॉर्ड त्यांनी ७६९ धावा बनवून तोडलेले आहे.  

मिळणारी शिकवण 
> जीवनात अशा लोकांची गरज  आहे, जे वाईट वेळेत साथ देतात.
> चांगले काम तुमच्या प्रत्येक दुबळेपणावर मात करते. 
> कमी वयात सुरू केलेले काम यशाची शक्यता वाढविते.