आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Abasaheb, Hanmant Puri Won The First Gold Medal, Maharashtra Kesari Wrestling Tournament Started In Pune

आबासाहेब, हनमंत पुरीने पटकावले पहिले सुवर्णपदक, पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिले सुवर्ण सोलापूर व उस्मानाबादच्या मल्लांनी आपल्या नावे केले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या स्पर्धेत ५६ किलो गटात सोलापूर जिल्ह्याच्या आबासाहेब अटकळे आणि ७९ किलो गटात उस्मानाबादच्या हनमंत पुरीने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.

माती गटातील ५६ किलो गटात फायनलमध्ये आबासाहेबने कोल्हापूर शहरच्या संतोष हिरुगुडे सोबत रोमांचक लढत पाहायला मिळाली. दोघांतील सामना ८-८ गुणांनी बरोबरी साधली. त्यानंतर अखेर गुण मिळत आबासाहेबने आपल्या जिल्ह्याच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले. विशेष म्हणजे, हे दोघे कात्रज तालमीमध्ये सोबत सराव करतात. त्याचप्रमाणे गादी विभागात ७९ किलाे गटात सोलापूरच्या रामचंद्र कांबळेने कोल्हापूर शहरच्या नीलेश पवारला १३-४ गुणांनी एकतर्फी पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश करत आपल्या सोलापूर जिल्ह्याचे तिसरे पदक निश्चित केले. प्रत्येक गटातील विजेत्या खेळाडूंना पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे २०, १० व ५ हजारांचे रोख बक्षीस देण्यात येईल.

स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपसंचालक आनंद व्यन्केश्वर, हिंद केसरी अमोल बुचडे, ललित लांडगे उपस्थित होते.

विजेते खेळाडू : माती विभाग ५७ वजनी गट - सुवर्ण - आबासाहेब अटकळे, सोलापूर जिल्हा (सुवर्ण), संतोष हिरुगडे, कोल्हापूर शहर (रौप्य), ओंकार लाड, कोल्हापूर जिल्हा (कांस्य).
हणमंतची सागरवर मात

माती गटातील ७९ किलो गटाच्या अंतिम लढतीत उस्मानाबादच्या हनमंत पुरीने सोलापूरच्या सागर चौगुलेला एकतर्फी झालेल्या सामन्यात ५-० ने हरवले. सामन्यात हनमंतने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदेने परभणीच्या गिरीधारी दुबेला ८-२ ने पराभूत करत कांस्यपदक आपल्या नावे केले.
 

बातम्या आणखी आहेत...