आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. कलामांनी केली होती वृत्तपत्र विक्री; यंदापासून त्यांचा जन्मदिवस 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वृत्तपत्र विक्रेता, ख्यातनाम अणुवैज्ञानिक ते देशाचे राष्ट्रपती असा प्रेरणादायी जीवनप्रवास करणारे डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ अाॅक्टाेबर या वर्षीपासून 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा केला जात अाहे. भल्या पहाटे वाचकांना नियमितपणे घरपाेच वृत्तपत्र पाेहाेचवण्याचे अविरत काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रति यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार अाहे. 

 

माजी राष्ट्रपती डाॅ. कलाम हे एक थाेर शास्त्रज्ञ म्हणून सर्वत्र परिचित अाहेत. मात्र बालपणी अापल्या कुटुंबीयांना अार्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र वितरणाचेही काम केले हाेते, हे फारच कमी लाेकांना माहिती अाहे. स्वत: डाॅ. कलाम यांनी अापल्या "विंग्ज ऑफ फायर' या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख केला अाहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचे अापल्या राेजच्या अायुष्यातही एक महत्त्वाचे स्थान अाहे. अापण झाेपेतून उठण्यापूर्वी, राेजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच अापल्या घरापर्यंत पाेहाेचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात, तेही पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता. या विक्रेत्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे अापले कर्तव्य अाहे, या भावनेतून साेमवारी राज्यातील विविध वृत्तपत्र संघटना व संस्थांच्या वतीने काही कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले अाहे. डाॅ. कलाम यांचे तरुणांनी उद्याेजक व्हावे हे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने साेमवारी मुंबईतील कुलाबा तेथील ताज हाॅटेलमध्ये 'ग्लोबल महाराष्ट्रीयन आंत्रप्रेन्योरशिप परिषदे'चे आयोजन केले अाहे. मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे गेल्या अाठ वर्षांपासून 'मी उद्योजक होणारच' या अंतर्गत मराठी उद्याेजक घडवण्याचा उपक्रम राबवला जात अाहे. 

 

आमचा सन्मान होतोय 
अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आमच्या कामाचा सन्मान होतोय याचा खूप आनंद होत आहे. यामुळे वृत्तपत्र व्यवस्थापन, वाचक आणि विक्रेते यांच्यात संवाद निर्माण होईल. आम्ही शासनाकडे काही मागण्या केलेल्या आहेत. त्या तातडीने सुटाव्यात असे यानिमित्ताने वाटते. अण्णासाहेब जगताप, अध्यक्ष, वर्तमानपत्र विक्रेता संघटना 

 

सोशल नव्हे, प्रिंट मीडियाच प्रभावी 
प्रिंट मीडिया असेपर्यंत वृत्तपत्र विक्रेत्यांची घरपोच सेवा अबाधित राहील. नफ्यासाठी नव्हे तर आता या व्यवसायाने सेवेचे रूप धारण केले आहे. कंपनीच्या कामगारांना ज्याप्रमाणे सोयी-सुविधा व सवलती दिल्या जातात, त्याप्रमाणे वृत्तपत्र विक्रेत्यांना वंचित-उपेक्षित न ठेवता सरकारने सुविधा द्याव्यात. डिजिटल मीडियाच्या तुलनेत प्रिंट मीडियाची विश्वसनीयता अधिक दृढ आहे. त्यामुळे या मीडियासाठी काम करताना आम्हाला आनंद वाटतो . नीलेश फाटके, सचिव, वर्तमानपत्र विक्रेता संघटना 

बातम्या आणखी आहेत...