आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद काँग्रेसला खिंडार, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार औरंगाबादमधून अपक्ष लढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसलाही जोरदार धक्का बसला आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली असतानाचा काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार बंड पुकारला आहे. काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, सत्तार नाराज होते. अखेर त्यांनी आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन, औरंगाबादमधून अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.


अब्दुल सत्तार उद्या(25 मार्च) काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी आमदारकीचा याआधीच राजीनामा दिला आहे, पण तो अजून मंजूर झालेला नाही. पण, औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले आहे.

 


सत्तार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पण, पाठिंबा मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, सर्वपक्षियांना पाठिंब्यासाठी भेटणार आहे, असे सत्तार यांनी सांगितले आहे. त्योसोबतच भाजपात जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनीही तशी ऑफर दिली नाही, असेही अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले.

 

कोण आहेत अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. जवळपास 30 वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली. सिल्लोडमध्ये त्यांचा चांगलाच दबदबा आहे.