आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल सत्तार यांची गिरीश महाजन यांच्याशी जामनेरमध्ये बंदद्वार चर्चा; भाजपात प्रवेश करण्याबाबत चर्चेला उधान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - काँग्रेसला साेडचिठ्ठी देणारे औरंगाबाद जिल्ह्यातील माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी दुपारी दोन वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जामनेर येथील निवासस्थानी भेट घेऊन बंदद्वार चर्चा केली. सुमारे अर्धा तास झालेल्या या भेटीत सत्तार यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. 


अब्दूल सत्तार यांनी काँग्रेसाचा राजीनामा दिला असून, सन्माजनक पक्षात प्रवेश घेण्याचा त्यांचा मानस आहे, असे सांगत महाजन यांनीही सत्तार यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले. सत्तार म्हणाले, ‘राधाकृष्ण विखे पाटील व माझी गिरीश महाजनांसोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. विधानसभेसाठी जागावाटपाची युतीच्या नेत्यांची चर्चा झाल्यानंतर आमच्या पक्षप्रवेशाचा निर्णय हाेईल.’