आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Abhimanyu Dasani Will Now Seen With Social Media Sensation Shirley Setia In The Next Movie 'nikamma'

'निकम्मा' चित्रपटात रोमान्स करताना दिसणार भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू, सोशल मीडिया सेंसेशन आहे चित्रपटातील अभिनेत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'मर्द को दर्द नहीं होता'या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारा भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीचा 'निकम्मा' हा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत गायिका शर्ले सेतिया भूमिका साकारणार आहे. 'हीरोपंती' आणि 'बागी' फेम शब्बीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाच्या एका भागाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. ते म्हणतात,' इंडस्ट्रीला नेहमी नवीन टॅलेंट देण्याचा माझा प्रयत्न असतो. अभिमन्यु आणि शिर्लेच्या या नवीन जोडीसाठी खूप उत्सुक आहे. मला त्यांच्यात टायगर आिण कृती या दोघांची छवी दिसते.' 

 

आतापर्यंत गाणारी शर्ले आपल्या चित्रपटातील पदार्पणासाठी खूप उत्सुक आहे. ती म्हणते,'यापेक्षा चांगले पदापर्ण माझ्यासाठी दुसरे असू शकत नाही. एका बाजून आंतरराष्ट्रीय स्टुडिओ या चित्रपटाशी जोडलेला आहे, तर दुसऱ्या बाजूने मी शब्बीर खान यांच्यासोबत काम करत आहे. 'मर्द को दर्द नहीं होता' भले अभिनेता म्हणून अभिमन्युचा पहिला चित्रपट होता पण त्याने यापूर्वी ‘दम लगा के हाईसा’ आणि ‘नौटंकी साला’ या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टरचे काम केले आहे.