आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Abhinandan, Minty Agarwal, Mirage 2000 Fighter Aircraft 9 Squadron Unit To Be Awarded Unit Citation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विंग कमांडर अभिनंदन आणि मिराजच्या स्क्वॉड्रन सिग्नल यूनिटला वायुसेनेचा विशेष सन्मान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या 51 व्या स्क्वॉड्रन आणि मिराज 2000 च्या 9 स्क्वॉड्रन, फ्लाइट कंट्रोलर मिंटी अग्रवाल यांच्या 601 सिग्नल यूनिटचा वायुसेना प्रमुख आरकेएस भदौरिया एअरफोर्सडेवर विशेष सन्मान करणार आहेत. तिन्ही यूनिटला हा सन्मान 26 फेब्रुवारील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक करणे आणि 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी विमानांना पळवून लावल्याबद्दल दिला जात आहे.

अभिनंदन यांना वीरचक्र मिळाला आहे
 
73 व्या स्वतंत्र्यता दिवशी सरकारने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करणाऱ्या वायु सैनिकांना वीरता पुरस्कार प्रदान केले. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना वीर चक्रने सन्मानित करण्यात आले. त्यांनी एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या एफ-16 विमानांना पाडले होते. वीर चक्र युद्धकाळात साहसी कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा तिसरा सर्वात मोठा सन्मान आहे. काश्मीरमध्ये पाक विमानांच्या घुसखोरीदरम्यान, फाइटर कंट्रोलरची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्क्वॉड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडलने सन्मानित केले आहे. या वेळसे वीरता पुरस्कार मिळणाऱ्या मिंटी एकमेव महिला आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...