आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Abhinandan Varthman Reaches His Squadron In Srinagar Instead Of Home On 4 Week Leave

विश्रांतीसाठी मिळाली 4 आठवड्यांची रजा..पण घरी न जाता देशसेवेसाठी एअरबेसला पोहोचले विंग कमांडर अभिनंदन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वायुदलाचे जांबाज वैमानिक आणि पाकचे एफ16 फायटर जेट हाणून पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पुन्हा देशसेवेत रुजु झाले आहे. वायुदलाने त्यांना 4 आठवड्यांची सुट्टी दिली होती. मात्र, सुट्टी घेऊन घरी न जाता श्रीनगर येथील एअरबेसवर परतले आहेत.

 

सूत्रांनुसार, अभिनंदन यांना 4 आठवड्यांची सुट्टी देण्यात आली होती. परंतु अभिनंदन यांनी चेन्नईला आपल्या घरी न जाता श्रीनगर येथील आपल्या एअरबेसवर पोहोचणे पसंत केले. पाकिस्तानातून मायभूमीत परतल्यानंतर अभिनंदन यांना रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी 4 आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला होता.

 

पाकचे एफ-16 फायटर प्लेट पाडले..
दरम्यान, 27 फेब्रुवारीला पाकिस्तान लष्कराचे तीन विमाने भारतीय हद्दीत शिरले होते. पाक प्रत्युत्तर देण्यासाठी विक कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 ने मारा करत पाकचे एफ-16 विमान पाडले होते. या प्रयत्नात अभिनंदन यांचे  मिग-21 पाकिस्तानच्या सीमेवर क्रॅश झाले होते. अभिनंदन यांना पाक लष्करांनी ताब्यात घेतले होते. नंतर अभिनंदन यांचा एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात पाक लष्कराचे अधिकारी अभिनंदन यांची चौकशी करताना दिसत होते. परंतु, अभिनंदन यांनी मोठे ध्येर्य दाखवत पाक अधिकार्‍यांना भारतीय माहिती देण्यास स्पष्‍ट नकार दिला होता. पाक सरकारवर चहुबाजुंनी दबाव वाढल्यानंतर पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी पाकच्या संसदेत विंग कमांडर अभिनंदन यांना सुरक्षित भारताकडे सोपविण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर विंग कमांडर मारभूमीत परतले होते.

बातम्या आणखी आहेत...