आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक बच्चनच्या लग्नात सामिल होऊ शकला नव्हता त्याचा भाऊ, अमिताभ-जयाने दिले होते निमंत्रण पण एका भितीमुळे लग्नात होऊ शकला नाही सहभागी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अभिषेक बच्चन 43 वर्षांचा झाला आहे. अभिषेकने 20 एप्रिल, 2007 मध्ये मिस वर्ल्ड राहिलेल्या ऐश्वर्या रायसोबत लग्न केले. अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नात अभिषेक बच्चनने इलाहाबादच्या 12 पेक्षा जास्त कुटूंबियांना निमंत्रण दिले होते. यामधून एका कुटूंबातील त्याच्या आतेभावालाही निमंत्रण देण्यात आले होते. त्या कुटूंबाच्या सूनेला आजही ऐश्वर्याला न भेटू शकल्याचे दुःख आहे. 

 

बच्चनच्या पैतृक घरात राहतात नातेवाईक 
- हरिवंश राय बच्चन यांचे वडील प्रताप नारायण श्रीवास्तवने इलाहाबादच्या कटघरमध्ये घर बनवले होते. या घरात एकेकाळी अमिताभची आत्या भगवान देवींचा मुलगा रामचंदर आणि त्याची पत्नी कुसुमलता राहत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा तिस-या नंबरचा मुलगा अनूप आपली पत्नी मृदुला आणि त्याच्या मुलांसोबत राहतो. 


- आमच्या वेबसाइटने काही महिन्यांपुर्वी अनूप आणि मृदुलासोबत बातचित केली होती. हे कुटूंब आता आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. मृदूला सांगते की, त्यांना काका-काकूकडून म्हणजेच जया आणि अमिताभ यांच्याकडून अभिषेकच्या लग्नाचे निमंत्रण आले होते. पण गरीबी आणि बच्चन कुटूंब त्यांना ओळखणार की नाही या भितीने ते लग्नात सहभागी झाले नाही. 


- अनूप आणि मृदुलानुसार, अभिषेक आणि ऐश्वर्याला भेटण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. पण त्यांना असे करता आला नाही. याचे दुःख त्यांना आयुष्यभरासाठी आहे. 

 

सासू-सास-यांच्या मृत्यानंतर मोडले नाते 
मृदुला सांगते, त्यांचे सासू-सासरे म्हणजेच रामचंदर आणि कुसुमलता यांच्या निधनानंतर बच्चन कुटूंबाशी त्यांचे नाते पुर्णपणे संपले. जोपर्यंत सासरे जिवंत होते तोपर्यंत बाबी जी (डॉ. हरिवंश राय बच्चन) यांचे पत्र येत असायचे. 

बातम्या आणखी आहेत...