आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Abhishek Bachchan: Bollywood Actor Abhishek Bachchan Instagram Post On After His Father Amitabh Bachchan Honoured With Dadasaheb Phalke Award By President Ram Nath Kovind

वडिलांना मिळालेल्या सन्मानाविषयी अभिषेकने लिहिले- माझी प्रेरणा माझे नायक आहात, आम्हाला तुमचा अभिमान आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरस्कारा स्वीकारल्यानंतर दिल्लीहून परत येत असताना पालकांसह अभिषेक बच्चन. - Divya Marathi
पुरस्कारा स्वीकारल्यानंतर दिल्लीहून परत येत असताना पालकांसह अभिषेक बच्चन.

बॉलिवूड डेस्कः 29 डिसेंबर रोजी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. जया बच्चन आणि अभिषेक बच्चन हे राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. समारंभातून परत आल्यानंतर अभिषेकने आपल्या इन्स्टाग्रामवर त्याच्या आईवडिलांसोबतचे एक छायचित्र शेअर करुन लिहिले, "माझी प्रेरणा, माझे नायक, आम्हाला तुमचा अभिमान आहे."

आम्हाला तुमचा अभिमान वाटतो पा: अभिषेकने लिहिले, "माझी प्रेरणा, माझे नायक. दादासाहेब फाळके मिळाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. आम्हाला सर्वांना तुमच्याविषयी अभिमान आहे. तुम्हाला खूप प्रेम.' अभिषेकने आणखी एक छायाचित्र शेअर केले. या छायाचित्राला त्याने कॅप्शन दिले, 'आनंददायक आठवण.'

विनोदी मूडमध्ये होते बिग बी : हा पुरस्कार मिळाल्यानंतर, अमिताभ यांनी मजेशीर अंदाजात एक प्रश्न विचारला की, हा पुरस्कार मिळाल्यामुळे मी आता घरी बसून आराम करू शकेन, हा संकेत तर नाही ना? यावर राष्ट्रपती भवनात उपस्थित सर्वजण हसू लागले. 23 डिसेंबर रोजी 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमिताभ यांना हा सन्मान घेता आला नाही. त्यावेळी चित्रपट पुरस्कारांचे वितरण उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...