आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरने विचारले, 'आई की पत्नी ? कुणाची जास्त भीती वाटते', उत्तरावर बहीण श्वेताने टोकले तर अभिषेक म्हणाला - 'तू गप्प बस'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता बच्चन, करण जोहरचा चॅट शो 'कॉफ़ी विद करन'मध्ये पोहोचले होते. अभिषेक आणि श्वेता स्पेशल या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये भाऊ बहिणीची मजेदार केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. अभिषेक, करणच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे तर श्वेता त्याची मज्जा घेत आहे. 

 

जेव्हा करणने विचारले कुणाला जास्त घाबरतो... आई की पत्नीला...
- रॅपिड फायर राउंडदरम्यान करणने अभिषेकला विचारले की, तो पत्नी आणि आई यांच्यापैकी कुणाला जास्त घाबरतो. तर त्याने उत्तर दिले, 'आई'. यावर श्वेताने टोकले आणि म्हणाली 'पत्नी'. श्वेताने असे टोकल्यामुळे अभिषेक गांगरला आणि म्हणाला, 'हा माझा रॅपिड फायर राउंड आहे...तू गप्प बस' यावर श्वेता म्हणते, "हा तुझ्यासोबत घरी जाणार आहे करण" उत्तरादाखल करणला म्हणाला, "याला चुकीच्या पद्धतीने नको घेऊ करण". 

 

श्वेताने सांगितले ती अभिषेकची कोणती गोष्ट करते सहन.... 
- करणने श्वेताला विचारले की, तिला अभिषेकाची कोणती गोष्ट सहन करावी लागते, यावर ती म्हणाली, "मला याचा 'सेंस ऑफ ह्यूमर' सहन करावा लागतो". उत्तर ऐकून करण खूप हसला आणि अभिषेकही फॅनी पद्धतीने हसला, मग सीरियस झाला. भाऊ बहिणीच्या मजेदार केमिस्ट्रीने भरलेला हा एपिसोड रविवारी, 20 जानेवारीला स्टार वर्ल्डवर टेलीकास्ट होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...