आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षांपासून पत्नी ऐश्वर्याची एक खास टिप फॉलो करतोय अभिषेक बच्चन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिषेक बच्चन 2 वर्षांच्या ब्रेकनंतर चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा झळकणार आहे. 2016 मध्ये आलेल्या 'हाउसफुल'नंतर आता तो 'मनमर्जिया'मध्ये दिसणार आहे. अभिषेक सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान अभिषेकने सांगितले की, त्याची पत्नी ऐश्वर्याने 18 वर्षांपुर्वी त्याला एक खास टीप दिली होती. जी तो आजही फॉलो करतो.
अभिषेकनुसार - "आम्ही दोघं तेव्हा पति-पत्नी नव्हतो. पहिल्यांदाच आम्ही 'ढाई अक्षर प्रेम के' करत होतो, तेव्हा मला ऐश्वर्याने सल्ला दिला होता.ऐश्वर्या म्हणाली होती- जेव्हाही तुम्ही फिल्मच्या सेटवर असता किंवा कॅमेरासमोर असता, तेव्हा आपले नाक आणि दात नेहमी स्वच्छ असायला हवे. मला वाटते की, हा सर्वात चांगला सल्ला आहे आणि मी हे नेहमी फॉलो करतो."


मुलीलाही नॉर्मल बालपण देण्याचा प्रयत्न करते ऐश्वर्या 
एवढेच नाही तर अभिषेकने सांगितले की, ऐश्वर्या मुलगी आराध्याला नॉर्मल बालपण देण्याचा प्रयत्न करते. अभिषेक म्हणाला - "आराध्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, तिचे आई-वडील अॅक्टर्स आहेत आणि चित्रपटांमध्ये दिसतात. परंतू तिला हे माहिती नाही की, तिचे आजी-आजोबा किती प्रसिध्द आहेत. आराध्याने नॉर्मल आयुष्य जगावे यासाठी ऐश्वर्या नेहमीच प्रयत्न करते." अभिषेक-ऐश्वर्याने 20 एप्रिल, 2007 ला लग्न केले. लग्नाच्या 4 वर्षांनंतर नोव्हेंबर 2011 ला मुलगी आराध्याचा जन्म झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...