आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Abhishek Bachchan Hugs Vivek Oberoi At Party, Forgetting Aishwarya's Humiliation

ऐश्वर्याचा अपमान विसरून पार्टीमध्ये विवेक ओबेरॉयला अभिषेक बच्चनने दिले आलिंगन, हसून बोलला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिषेक बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांची एक व्हिडीओ क्लिप समोर आली आहे, दोघे एकमेकांना आलिंगन देताना दिसत आहेत. ही क्लिप मुंबईमध्ये झालेल्या सहारा इंडिया कुटुंबाच्या पार्टीतील आहे, जी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय शटलर पीव्ही सिंधूच्या सन्मानासाठी ठेवली गेली होती. पार्टीमध्ये अभिषेक पिता अमिताभ बच्चनसोबत पोहोचला होता. विवेक पिता सुरेश ओबेरॉय, आई यशोधरा आणि पत्नी प्रियांकासोबत आलं आहोत.  
 
 

 

विवेक-अभिषेक यांच्यामध्ये झाले बोलणे... 
झाले असे की, विवेक अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी संपूर्ण कुटुंबासोबत तिथे उभा होता. तेव्हाच अमिताभ बच्चन आपला मुलगा अभिषेकसोबत तिथे पोहोचले. अभिषेक सर्वात आधी सुरेश ओबेरॉय आणि नंतर यशोधरा यांना भेटला. नंतर हसत हसत विवेकला आलिंगन दिले आणि मग त्याच्या पत्नीलाही भेटला. व्हिडिओमध्ये दिसते की, आलिंगन दिल्यानंतर विवेक आणि अभिषेक यांच्यामध्ये काहीतरी बोलणेदेखील झाले. नंतर अभिषेक तिथून विवेकच्या खांद्यावर थाप मारत निघून गेला. विवेकनेदेखील अभिषेकच्या खांद्यावर थाप मारली.  
 
 

दोघांचे एकमेकांना इतके हसत हसत भेटणे यामुळे आहे चर्चेत... 
मेमध्ये विवेकने एक मीम शेअर केले होते. यामध्ये ऐश्वर्याला तीन वेगवेगळ्या लोकांसोबत दाखवले गेले होते. सर्वात वरती ऐश्वर्या सलमानसोबत दिसत होती, ज्याला ओपनिंग पोल असे टायटल दिले गेले. दुसऱ्या ठिकाणी विवेक ऐश्वर्यासोबत दिसले, ज्याला एग्झिट पोल असे नाव दिले गेले होते आणि सर्वात खाली ऐश्वर्या तिचा पती अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबत दाखवली गेली होती, ज्याला रिझल्ट असे टायटल दिले गेले होते. एका ट्विटर यूजरने शेअर केलेला हा फोटो री-ट्वीट करत विवेकने लिहिले होते की, हा फोटो त्याला क्रिएटिव्ह वाटला, त्यामुळे त्याने हा शेअर केला. यामध्ये कोणतेही पॉलिटिक्स नाही. हेच आयुष्य आहे.  
 
 
यानंतर रिपोर्ट्समध्ये म्हंटले गेले होते की, अभिषेक ऐश्वर्याच्या अपमानामुळे रागावला आहे. तो विवेकला सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार आहे मात्र ऐश्वर्याने त्याला शांत राहण्याचे सांगितले आहे. जेव्हा ऐश्वर्याला विवेकच्या ट्वीटबद्दल कळाले तेव्हा तिने अभिषेकला समजावले की, रंगवण्याची गरज नाही. विवेक हे आपला चित्रपट 'नरेंद्र मोदी बायोपिक' साठी पब्लिसिटी मिळवण्यासाठी करत असलेला स्टंट आहे. या ट्वीटवर प्रतिक्रिया देऊन त्याला आणखी पब्लिसिटी मिळवून देण्याची काहीही गरज नाही.  

बातम्या आणखी आहेत...