आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonam Kapoor Husband Anand Ahuja Apply Mehndi On Karwa Chauth: Abhishek Bachchan Keep Fast For Wife Aishwarya Rai And TV Actor Gautam Rode Also Fast Fist Time On On Karva Chauth

ऐश्वर्या रायसाठी पती अभिषेक बच्चनने ठेवला उपवास, तर सोनमच्या पतीने हातावर काढली मेंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. करवाचौथचा व्रत बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्समध्ये खुप प्रसिध्द आहे. अनेक स्टार्सच्या पत्नी हा व्रत ठेवतात. तर काही अॅक्टर्सही आपल्या पत्नीसाठी हा व्रत करत असतात. आता ऐश्वर्या रायचा नवरा अभिषेक बच्चनने तिच्यासाठी उपवास केला आहे. अभिषेकने हा उपवास केला यासोबतच त्याने सोशल मीडियावर सर्व पतींना आपल्या पत्नीसोबत हा उपवास करण्याचा सल्ला दिला आहे. अभिषेकने ट्वीट केले की, "महिलांना करवाचौथसाठी गुड लक... पण जबाबदार पतीनेही आपल्या पत्नीसोबत हा उपवास करायला हवा, मी हा उपवास करत असतो." यावरुन स्पष्ट होते की, ऐश्वर्याही करवाचौथचा उपवास करते आणि तिच्यासोबत अभिषेक बच्चनही उपवास करतो. ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाला 11 वर्षे झाले आहेत.


करवाचौथला सोनमचा नवरा आनंदने काढली मेंदी 
- सोनम कपूरचा पती आनंद आहूजाने करवाचौथची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे त्याने सोनमसोबत करवाचौथसाठी हातावर मेंदीही काढली आहे.
- सोशल मीडियावर दोघांचे फोटोज समोर आले आहे. यामध्ये कपलच्या हातावर दोघांच्या नावाचे पहिले अक्षर AS लिहिलेले आहेत. यासोबतच मेंदीने हार्ट शेप काढण्यात आला आहे. 
- सोनमने 7 मे 2018 रोजी दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न केले. दोघांचे लग्न पंजाबी पध्दतीने झाले होते. 
- सोनमचा पती आनंद आहूजा हा शाही एक्सपोर्ट्सचे मालक हरीश आहूजाचा नातू आहे. आनंद शाही या कंपनीचा मॅनेजिंग डायेरक्टर आहे. तर आनंद दिल्ली येथील मल्टी ब्रांड स्नीकर कंपनी BHANE चा सीईओ आणि को-फाउंडर आहे. 

 

गौतम ठेवणार पत्नी पंखुडीसाठी उपवास 
- टीव्ही अॅक्टर गौतम रोडेने पत्नी पंखुडी अवस्थी(टीव्ही अॅक्ट्रेस)साठी उपवास ठेवला आहे. गौतम सध्या टीव्ही शो 'काला भैरव रहस्य' सीजन 2 ची शूटिंग करतोय. अशावेळी त्याची पत्नी पंखुडी त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी सेटवर पोहोचली आहे. यामुळे दोघांना एकत्र वेळ घालवता येईल.
- गौतमने एका एन्टटेन्मेंट वेबसाइटला सांगितले की, "मी माझ्या आयुष्यात कधीच उपवास ठेवला नाही, पण मला आनंद आहे की, मी पहिला उपवास हा पत्नी पंखुडीसाठी ठेवला आहे."

- गौतम-पंखुडीने 6 फेब्रुवारी 2018 रोजी लग्न केले होते. गौतमन आणि पंखुडीची पहिली भेट सोनी टीव्हीचा शो 'सूर्यपुत्र कर्ण'(2015) च्या सेटवर झाली होती. येथे दोघं मित्र बनले, यानंतर गौतम आणि पंखुडीच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

 

 

बातम्या आणखी आहेत...