आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाच्ची नव्या नवेलीसोबत जात होता अभिषेक बच्चन, फोटोग्राफर्सवर भडकला, व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स उडवत आहेत खिल्ली, एकाने विचारले, - कशाचा एवढा अटीट्युड आहे भाऊ ? : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिषेक बच्चनचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, तो फोटोग्राफर्सवर नाराज झालेला दिसत आहे. झाले असे की, फोटोग्राफर्स त्याची भाच्ची नव्या नवेली नंदाचे फोटोज क्लिक करण्यासाठी कारचा रास्ता अडवून उभे राहिले आणि कारसाठी रास्ता व्हावा म्हणून अभिषेकी कॅमेरामॅनला रास्ता सोडण्यासाठी सांगत होता. मात्र त्याचे हे वागणे पाहून सोशल मीडियावर त्याची चेष्टा केली जात आहे. एका यूजरने लिहिले - 'काम तर काहीच नाहीये, फोटो तर काढा निदान'. दुसरा यूजर म्हणाला - 'जशी आई तास मुलगा'.  

 

एका पार्टीहुन परत येत होता अभिषेक...
- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा अभिषेक करन जौहरची ख्रिसमस पार्टी अटेंड करून परत येत होता. तेव्हा फोटोग्राफर्स नव्याचे फोटोज क्लिक करण्यासाठी कारसमोर आले होते. 

 

सोशल मीडियावर आलेल्या कमेन्ट्स... 
- तसेही यांना कुणी विचारात नाही पण भाव असा खातील जसे एखादे सुपरस्टार असो. 
- आपल्या आईसारखाच आहे, नेहमी रागात असतो. 
- अमिताभ सरांचे नाव बुडवले. 
- लोकच यांना स्टार बनवतात म्हणून त्यांना यांचे फोटोज क्लिक करण्याचा पूर्ण हक्क आहे. 
- कोशाचा एवढा अटीट्युड आहे भाऊ. 
- मोठ्या झाडाची एक तुटलेली फांदी.