आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : अभिषेक बच्चन आज (5 फेब्रुवारी) 44 वर्षांचा झाला आहे. यानिमित्ताने त्याची पत्नी ऐश्वर्या रॉय बच्चनने बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. ऐशने फोटोज दोनदा शेअर केले, पहिले केक कटिंग सेरेमनीच्या आधी आणि दुसरा त्यानंतर. पहिल्या फोटोजमध्ये अभिषेक-ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या यांच्यासोबत जया आणि अमिताभ बच्चनदेखील दिसत आहेत.
अभिषेकसाठी जो बर्थडे केक आणला गेला होता, तो अभिषेकचे स्पोर्ट्सवरील प्रेम लक्षात घेऊन हा केक तयार केला गेला होता. ऐशने दुसऱ्यांदा जे फोटोज शेअर केले त्यामध्ये अभिषेक आणि आराध्या हसताना दिसत आहेत. या फोटोजसोबत लिहिले आहे, 'हॅप्पी बर्थडे बेबी-पप्पा. लव्ह लव्ह लव्ह ऑलवेज'
अभिषेकच्या वाढदिवशी त्याचे पिता अमिताभ यांनी त्याच्या जन्माच्या आधीच्या रात्रीची आठवण काढत आपले पिता हरिवंश राय बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. त्यांनी लिहिले, "तारीख पाचव्या दिवसापर्यंत वाढली... जेव्हा रात्री उशिरा अभिषेकचा जन्म झाला... ब्रीच कँडी रुग्णालय आणि संपूर्ण दिवस त्याच्या येण्याच्या उत्सुकतेत होता... शेवटी तो झाला आणि तिथे आनंद आणि उत्सवाचे वातावरण बनले.... आजोबांचे आशीर्वाद."
निरागसतेची आठवण कधीच जात नाही...
पुढे अभिषेकला शुभेच्छा देत अमिताभ यांनी लिहिले, 'कितीही वर्षे जावो, मुल नेहमी मुलच राहाते.... आज भले त्याचे वय 44 वर्षेंचे असेल, पण लहान मुलासारख्या निरागसतेसोबत त्याच्या चेहऱ्यावरील दोन छोटी छोटी बोटे तुम्ही विसरू शकत नाही आणि असे कधीच होऊ शकत नाही.'
अभिषेक सध्या दोन प्रोजेक्टवर करत आहे काम...
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर अभिषेक बच्चन सध्या सुजोय घोषचा चित्रपट 'कहानी' च्या स्पिन ऑफ 'कहानी-बॉब बिस्वास' वर काम करत आहे. याव्यतिरिक्त त्याला अजय देवगण प्रोडक्शन्समध्ये बनत असलेला चित्रपट 'द बिग बुल' साठीही निवडले गेले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.