आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुराग कश्यपचा \'गुलाब जामुन\' चित्रपट रखडला, अभिषेक-ऐश्वर्या एकत्र दिसण्याची शक्यता कमी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. अभिषेक बच्चन अाणि ऐश्वर्या राय 'गुलाब जामुन' चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची चर्चा ब-याच दिवसांपासून होती. मात्र आता हा चित्रपट बंद पडला आहे. त्यामुळे अभिषेक हा चित्रपट सोडून इतर प्रकल्पात व्यस्त झाला आहे. अॅश-अभिने 'गुरू', 'उमराव जान', 'रावण', 'धूम 2' आणि 'कुछ ना कहो', 'सरकार राज', 'ढाई अक्षर प्रेम के', 'बंटी और बबली' यात काम केले आहे. 

 

अनेक बदल करूनही 
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती. दोघे अनुराग कश्यपच्या 'गुलाब जामुन'मध्ये सोबत दिसणार होते. याची घोषणा करण्यात आली होती. आता हा प्रकल्प बंद झाल्याची चर्चा आहे. अनुरागने या चित्रपटाची घोषणा त्या वेळी केली होती ज्या वेळी अभिषेक त्यांच्या 'मनमर्जियां' मध्ये काम करत होता. 

 

अभिषेक या चित्रपटाबद्दल खूप उत्साही होता. दरम्यान, अनुरागची निर्मिती कंपनी फँटम बंद झाली आणि नोव्हेंबरमध्ये निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी चित्रपट निर्मितीची जबाबदारी घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या रॉय यांनी आधी या भूमिकेला होकार दिला होता, त्यानंतर तिने या चित्रपटात काही बदल सुचवले. तथापि, त्यांच्या म्हणण्यानुसार, बदल करण्यात आले होते तरीदेखील तिने करण्यास नकार दिला. त्यानंतर चित्रपट संकटात सापडला. याबद्दल पुन्हा ऐश्वर्या रॉयशी संपर्क साधला गेला, परंतु जेव्हा ती विचार बदलण्यास सहमत नव्हती तेव्हा निर्मात्यांनी चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला. 

 

या प्रकल्पावर काम करत आहे अभिषेक 
अभिषेक निर्माते शैलेश आर. सिंहच्या गुन्हेगारीवर आधारित प्रकल्पावर काम करत आहे. यात तो गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. तो ड्रग माफियाकडून आपल्या अपहृत मुलाची सुटका करतो. याव्यतिरिक्त तो वेब सिरीज 'ब्रीद 2'मध्येही काम करत आहे. 

 

अभिषेक करणार होता काम, ऐश्वर्याने दिला नकार 
निर्मात्यांनी दुसऱ्या जोडीसोबत चित्रपट करण्याचा विचार केला होता, नंतर त्यांनी तो विचारही सोडून दिला. खरं तर, अभिषेक आणि ऐश्वर्या प्रेमीयुगुलाचे पात्र करू इच्छित नाहीत. पडद्यावर प्रेमीयुगुलाचे पात्र साकारण्यास मनाई करणारे अभि-अॅश हे एकटे जोडपे नाही, तर यापूर्वी करिना आणि सैफ यांनीदेखील नकार दिला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा करणार आहेत. शूटिंग याचवर्षी सुरू होणार होते. अनुराग कश्यपची निर्मिती कंपनी फँटम बंद झाल्यानंतर अनेक प्रकल्पांवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चादेखील होती. आता अनुराग इतर निर्मिती कंपनीसोबत िमळून आपले प्रकल्प पूर्ण करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...