आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी सर्वांनाच दिलाय धोका; आत्महत्या करतोय, 15 लाख रुपये वाटून घ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाेएडा - नाेएडातील एमएसएमई मंत्रालयांतर्गत इंडिया रायझिंग नावाने बनावट कार्यालय उघडले. त्याने सुमारे १०० लाेकांकडून काेट्यवधी रुपये उकळल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सरकारी नाेकरी देण्याचे आमिष दाखवून लाेकांकडून ५ ते १५ लाख रुपये लाचेपाेटी घेतले. त्यानंतर भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याेग मंत्रालयाचे मंत्री गिरिराज सिंह यांचे बनावट हस्ताक्षर असलेले पत्र देऊन लाेकांना वेगवेगळ्या ग्रेडची नाेकरी दिली. या कटाचे  संपूर्ण नेटवर्क अभिषेक गुप्ता या २७ वर्षीय तरुणाने उभारले हाेते. ताे आयएएस अधिकारी व केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा निकटवर्तीय  असल्याचे सांगत हाेता. त्याने साेमवारी पहाटे सर्वांना मेसेज पाठवून फाेन बंद केला. मेसेजमध्ये तुम्हा लाेकांकडून घेतलेले १५ लाख रुपये शिल्लक आहेत. ते कार्यालयात आहेत. आपसात वाटून घ्या, मी आत्महत्या करत आहे, असा मजकूर  पाठवला. 


कोणी जमीन विकून, तर कोणी उधारीचे पैसे दिले
फसवणूक झालेले सर्व लाेक उत्तर प्रदेशातील वाराणसी, बलिया, गाझियाबाद याशिवाय, दिल्ली, फरिदाबाद, जयपूर व भाेपाळसह अन्य भागातील आहेत. त्याच्या षडयंत्रात फसलेले बहुतांश तरुण आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील आहेत. कोणी जमीन विकली, तर कोणी व्याजाने पैसे काढून त्याला दिले आहेत. यात मध्यस्थांनी पाच लाख रुपये उकळले, तर अभिषेकला २ ते ३ लाख रुपयेच पोहोचते केले, असे सांगितले जात आहे. 


अशी फसवणूक| इंडिया रायझिंग नावाने सरकारी उपक्रम सांगून नाेकरीसाठी घेतले ५ ते १५लाख रु. 
या फसवले गेलेल्या लाेकांनी साेमवारी नाेएडा सेक्टर  - २० च्या पाेलिस ठाण्यात तक्रार दिली.  त्यांची तक्रार रात्री उशिरापर्यंत लिहून घेतली नव्हती. फरीदाबादच्या वंश याने सांगितले, अभिषेक गुप्ता याने आॅगस्ट २०१८ मध्ये  एमएसएमई मंत्रालयाचा सरकारी उपक्रम असल्याचे सांगून नाेएडा सेक्टर - ८ मध्ये इंडिया रायझिंग नावाने कार्यालय सुरू केले. तो स्वत:ला संचालक सांगत असे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांची बनावट सही करून पैसे मिळाल्यानंतर बनावट लेटरपॅडवर ऑफर लेटर देत होता. इंडया रायझिंग नावाची वेबसाइटही त्याने तयार केली होती. ती पाहून कोणाला संशय आला नाही. 


मध्यस्थांमार्फत विद्यार्थ्यांना फसवले
फसवणूक झालेल्या तरुणांनी सांगितले, आम्ही सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होतो. त्यादरम्यान काही भामट्या दलालांनी नोकरीचे आमीष दाखवले. त्यांनी आम्हाला वेबसाइट दाखवली. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे बनावट  लेटरपॅड दाखवले. ग्रुप डीपासून वेगवेगळ्या ग्रेडच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून इंजिनिअरिंगच्या मुलांपासून अनेक बरोजगारांना फसवले. पगाराच्या िहशेबाने कोणाकडून पाच लाख, तर कोणाकडून १५ लाख रुपये उकळले. 


कंपनी बंद झाल्याचा मेसेज पाठवला
अभिषेक गुप्ता याने व्हाॅट्सअॅप ग्रुपवर साेमवारी पहाटे ४.२१ वाजता अनेक वेगवेगळे मेसेज पाठवले. त्यात लिहिले, ‘पैसे अथवा लाच देऊन सरकारी नाेकरी मिळते, हा लाेकांचा गैरसमज आहे. जेथे पैसे घेतले जातात, तेथे फसवणूकच हाेते. यासाठी मी माझ्या  कुटुंबीयांसह अन्य लाेकांनाही फसवले आहे. मला जगण्याचा काहीएक अधिकार नाही. आता कंपनी बंद हाेईल. मी खाेटे सांगून कंपनी चालवण्याचा प्रयत्न केला. घरच्यांना मी एक यशस्वी व्यक्ती म्हणून सिद्ध करून दाखवणार हाेताे. 

बातम्या आणखी आहेत...