आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाविषयी एवढी घृणा की मुलाचे शव घेण्यासाठीही वडील गेले नाहीत, जाणून घ्या काय आहे प्रकरण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबोहर/जालंधर : गँगस्टर अंकित भादूचे एन्काउंटरच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी पंजाबमधील डेरा बस्सी स्थिती सरकारी दवाखान्यात पोस्टमोर्टम करण्यात आले. त्यानंतर त्याचे काका, माजी सरपंच आणि कुटुंबातील दोन सदस्य त्याचे शव घेऊन शेरेवाला गावात पोहोचले. संध्याकाळी पाच वाजता पोलीस बंदोबस्तामध्ये अंकितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेमध्ये पंजाबमधील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.


अबोहर-हनुमानगढ राज्य मार्ग तसेच इतर काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तीची व्हिडीओग्राफी करण्यात आली. पोलिसांनी मागील तीन दिवसांपासून चोख बंदोबस्त ठेवला होता. सध्याही पंजाब पोलीस दलातील काही जवान गावामध्ये तैनात आहेत.


शेरेवाला गावात पोहोचली भास्कर टीम...कडेकोट सुरक्षा, प्रत्येक गोष्टीवर सीसीटीव्हीची नजर, पोस्टमोर्टममध्ये शरीरातुन निघाली एकच बुलेट, अंकितच्या वडिलांची तरुणांना अपील...
'माझा एकुलता एक मुलगा वयाच्या 25 व्या वर्षी आम्हाला सोडून गेला, यापेक्षा मोठे दुःख आई-वडिलांसाठी असू शकत नाही. मला माहिती आहे की, तो खूप चुकीचे काम करत होता आणि याचे परिणामही तसेच होणार होते. माझी  पंजाब पोलिसांच्या एन्काउंटर करणाऱ्या टिमविषयी कोणतीही तक्रार नाही. फक्त, तरुणांना एक अपील करतो की अंकितप्रमाणे कोणीही बनण्याचा प्रयत्न करू नये कारण असे बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचा शेवटही असाच होईल. (हे वाक्य बोलताना त्यांचे दिले भरून आले परंतु स्वतःला सांभाळत पुन्हा म्हणाले) जेवढे दुःख आज आम्हाला आमचा मुलगा गेल्याचे आहे तेवढेच दुःख त्या कुटुंबांनाही असेल जे अंकितमुळे त्यांच्या प्रिय व्यक्तींपासून दुरावले. हिंदू धर्मामध्ये प्राण्याला मारनेही मोठे पाप मानले जाते मग येथे तर मनुष्याला मारण्याचे किती मोठे पाप त्याने केले. अंकित अभ्यासात हुशार होता परंतु लॉरेन्स बिष्णोईच्या संपर्कात आला आणि वाईट संगतीला बळी पडला. 


गुन्हेगारी जगात असा काही रमून गेला की पुन्हा परत आला नाही. अंकितने सरेंडर केले असते तर त्याचा जीव वाचला असता. एवढे बोलून ते पुन्हा भावुक झाले आणि हात जोडून म्हणाले- आणखी कोणीही अंकितसारखे होण्याचा प्रयत्न करू नका. जो ज्याप्रमाणे कर्म करतो त्याला फळही तसेच मिळते. आम्ही आमच्या मुलाला मुकलो आहोत आता कोणीही आपल्या प्रियजनांपासून दूर जाऊ नये.' 

बातम्या आणखी आहेत...