आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भावस्थेच्या फक्त 6 आठवड्यांतच गर्भपात, दुःखातून सावरले नव्हते दाम्पत्य, 7 महिन्यानंतर पुन्हा घडली एक घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोलैडो - अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेला आपण गर्भवती असल्याची सुखद घटना समजली. परंतु हा आनंद फक्त ६ महिन्यांपुरताच  मर्यादित होता. अचानक जेंव्हा डॉक्टरांनी त्यांना गर्भपाताची बातमी दिली. तेंव्हा दोघांना अतिशय दुःख झाले. या दुःखातून सावरायला त्यांना खूप वेळ लागला. जवळपास ७ महिन्यानंतर तिला पुन्हा पोटात दुखू लागले. आणि अचानक मोठ्या बॅग सारखे काहीतरी त्यांच्या बेडरूममध्ये येऊन पडले. त्या ऍमोनॉटिक बॅगमध्ये त्यांचे बाळ होते. अचानक झालेल्या बाळाच्या जन्माने दाम्पत्य आनंदी झाले. 

 

गर्भवती असल्याचे समजलेही नव्हते महिलेला
- ही गोष्ट आहे ओहियो राज्यातील टेलैडो शहरातील. मेरेडिथ ली बरचम आणि तिचे पती ब्रेंडन यांना मूल होणार असल्याची आनंदी बातमी समजली.  पण हा, आनंद ६ आठवड्यांपुरताच मर्यादित होता. 
- डॉटरांनी दाम्पत्यांना सांगितले की, मेरेडिथ यांचा गर्भपात झालाय. दोघांना ही,बातमी कळताच अतिशय दुःख झाले. या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न दाम्पत्य  करत होते. 
- या गोष्टीला जवळपास ७ महिने होऊन गेले होते. ते आपल्या पारिवारिक आयुष्यात पूर्णपणे व्यस्त होऊन गेले होते. घटनेचा त्यांना जवळजवळ  विसर पडला होता .या दरम्यानच एक दिवस दोघेही घरी असतांना विचित्र घटना घडली. 
- मेरेडिथच्या पोटामध्ये अचानक वेदना होवू लागल्या. ती वेदनेने त्रस्त होती. आणि ब्रेंडन तिची मदत करत होता. त्याला काहीच समजेनासे झाले. 
- ब्रेंडनने थोड्या वेळात पहिले की, फरशीवर एका बॅग सारखे काहीतरी पडलेले होते. त्याने पहिले त्यामध्ये एक छोटे बाळ आहे. ही बॅग एमनियॉटिक बॅग सारखी होती.आणि त्या बॅग बरोबरच बाळ मेरेडिथ यांच्या गर्भातून बाहेर आले होते .   
- बाळाला पाहून दाम्पत्य चकित झाले. कारण त्यांना त्याविषयी काहीच कल्पना नव्हती. गर्भपातानंतर तिला गर्भवती असल्याची जाणीवही कधी झालेली नव्हती.   
- घरात अचानक होणाऱ्या विचित्र वेदनेननंतर तिला एका बाळाला जन्म दिल्याचा अनुभव झाला. 80 हजारांतून एखाद्या सोबत अशी घटना घडत असते. 

 

मुलीला दिला जन्म 
-  बॅगजवळ पोहचले तेव्हा आतील बाळ मृत अवस्थेत आहे की जीवंत हेच त्यांना कळत नव्हते. पण एक दोन मिनिटांत ही बॅग फाटली आणि मुलीला जन्म डिल्याचे मेरिडीथला लक्षात आले.  

- पण अजूनही बाळ रडत नव्हते किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करत नव्हते. तेवढ्यात ब्रँडनने इमर्जनसी नंबर वर कॉल केला आणि मेडिकल टीमला बोलावले. 
 - मेडिकल टीमने  बाळाच्या गळ्यात अडकलेला कॉर्ड कट केले.  त्यानंतर त्याने रडणे आणि नेहमीप्रमाणे श्वास घेणे सुरु केले. त्यानंतर दोघांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.  

 

बातम्या आणखी आहेत...