Home | Maharashtra | Mumbai | About half an hour discussion between Modi and Fadnavis in delhi

मुख्‍यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट; मराठा आरक्षण, राज्‍यातील सद्यस्थिती यावर दीड तास चर्चा

प्रतिनिधी | Update - Aug 07, 2018, 05:53 AM IST

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्‍यात दीडतास चर्चा

  • About half an hour discussion between Modi and Fadnavis in delhi

    नवी दिल्ली- मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांच्यात संध्याकाळी तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    दुसरीकडे, राज्यात मराठा, धनगर इतर इतर समाजांच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी दिल्लीत बैठक बोलावल्याचे वृत्त आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे आणि भाजप खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तथापि, रात्री उशिरापर्यंत याबाबत अधिकृत माहिती देण्यात अाली नव्हती. या बैठकीआधीच मोदी-फडणवीस यांच्यात खलबते झाली.


    आरक्षणासाठी ब्राह्मण, बंजाराही अाता मैदानात
    धनगर व मुस्लिम समाजानेही आरक्षणाची मागणी उचलून धरली. त्यातच अाता ब्राह्मण समाजही अारक्षणाच्या मागणीसाठी तयारी करत अाहे. बंजारा समाजही भटक्या विमुक्तांना स्वतंत्र अारक्षण देण्याच्या मागणीसाठी ८ अाॅगस्ट राेजी मुंबईतील अाझाद मैदानात धरणे अांदाेलन करणार अाहे.

Trending