आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीरा कुमार यांचा स्वाभिमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या गाजत असलेल्या भारतीय मुत्सद्दी देवयानी खोब्रागडे प्रकरणात अमेरिकेची मग्रुरी दिसून येते. आपण जगाचे पोलिस व न्यायाधीशही आहोत असा अमेरिकेचा समज आहे. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीकडे मात्र सगळ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. लोकसभा सभापती मीरा कुमार अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार होत्या. मीरा कुमार यांची सुरक्षा तपासणी केली जाणार आहे काय, अशी विचारणा सभापती कार्यालयाने अमेरिकन प्रशासनास केली होती. सुरक्षा तपासणी केली जाईलच असे त्यांच्याकडून उत्तर आले तेव्हा मीरा कुमार यांनी अमेरिकेचा दौराच रद्द केला. काही मंडळी, आपण एखाद्या दुसर्‍या देशात असताना त्या देशाचे कायदे पाळायलाच हवेत, अशी लंगडी सबब पुढे करतीलही, पण दुसर्‍यांचा मान ठेवताना आपण आपल्या अस्मितेशी मुळीच तडजोड करू नये हे साधे सूत्र पाळण्याचे भान मात्र नक्कीच ठेवायला हवे. मीरा कुमार यांनी ते ठेवले याबद्दल त्यांचे अभिनंदन करावयास हवे.