आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाभारत युद्ध समाप्तीनंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा गांधारी खूप रंगात होत्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारत युद्धामध्ये पांडवांनी कौरवांना पराभूत केले होते. कौरव पक्षातील सर्व योद्धे मारले गेले होते. शेवटी भीमाने गदा युद्धामध्ये दुर्योधनाला पराभूत केले आणि त्याचा मृत्यू झाला. युद्ध समाप्त झाल्यानंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले होते. दुर्योधनाला अन्यायपूर्वक मारल्यामुळे गांधारी खूप रागात होत्या. भीमाने गांधारीला सांगितले की- मी अधर्माने दुर्योधनाला मारले नसते तर त्याने माझा वध केला असता.


गांधारीने विचारले की- तू दुःशासनचे रक्त पिले, हे योग्य होते का? तेव्हा भीमाने सांगितले की- दुःशासनाने जेव्हा द्रौपदीचे केस पकडून तिला सभेत आणले होते तेव्हाच मी प्रतिज्ञा केली होती. जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली नसती तर क्षत्रिय धर्माचे पालन झाले नसते. परंतु दुःशासनचे रक्त माझ्या दातांच्या पुढे गेले नाही.


काळे पडले होते युधिष्ठिरचे नखं
भीमानंतर युधिष्ठिर गांधारीला भेटण्यासाठी गेले. गांधारी त्यावेळी खूप रागात होत्या. गांधारीची दृष्टी डोळ्यावरील पट्टीमधून युधिष्ठिरच्या पायांवर पडताच युधिष्ठिरचे नखं काळे पडले. हे पाहून अर्जुन श्रीकृष्णच्या मागे लपले आणि नकुल-सहदेवसुद्धा तेथून निघून गेले. थोड्यावेळाने गांधारीचा क्रोध शांत झाल्यानंतर पांडवांनी त्यांचा आशीर्वाद घेतला.

0