आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही तर वैचारिक दिवाळखोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"अश्लील संकेतस्थळे (वेबसाइट्स ) बंद करणे म्हणजे भारताचे तालिबानीकरण करणे होय,' असे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा याचे मत आहे. या बंदीचे स्वागत करणे तर दूरच, उलट त्याबाबत गळा काढून दाखवण्यात जी धन्यता वाटत आहे, त्यावरून यांना समाजहिताची किती काळजी आहे, हे लक्षात येते. समाजाला बिघडवणाऱ्या या संकेतस्थळांतून असे कोणते प्रबोधन होत आहे की ज्यावर कुऱ्हाड घातल्याने मोठे नुकसान होणार आहे? वाईट गोष्टींना चिरडण्यासाठी कठोर पावले उचलली जाणे गरजेचे झाले असताना त्याची तुलना तालिबानी हैवानांशी करणे म्हणजे स्वत:ची वैचारिक दिवाळखोरी प्रगट करणे होय. हे देवरा यांना ठाऊक नाही का ?