आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Abram Birthday Special : When Aryan, Suhagan Grew Up Shahrukh Was Missing The Kids, So The Third Baby Planned

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Abram Birthday Special : आर्यन, सुहाना मोठे झाले तर मुलांना मिस करू लागला होता शाहरुख, त्यामुळे प्लॅन केले तिसरे बेबी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम 6 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 27 मे 2013 ला सरोगसीद्वारे झाला होता. पण तुम्हाला माहित आहे का की, आधीच दोन मुलांचे पिता असलेला शाहरुखच्या मनात तिसऱ्या बाळाचा विचार का आला ? स्वतः शाहरुखने याचा खुलासा 2013 मध्ये अबराम च्या जन्मानंतर एका इंटरव्यूमध्ये केला होता.  

 

आम्ही मुलांना मिस करू लागलो होतो : शाहरुख... 
शाहरुखने इंटरव्यूमध्ये सांगितले, "माझा मुलगा 16 (आता 22) वर्षांचा आहे आणि मुलगी 13 (आता 19) वर्षांची आहे. पण मागच्या चार-पाच वर्षांपासून ते घराबाहेर जरा जास्तच राहू लागले, शाळेत जाऊ लागले. आधी ते माकडांसारखे चिकटलेले असायचे, लहान मुलांसारखे राहायचे आणि मला त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यायचा. पण मागच्या चार-पाच वर्षांपासून वातावरण असे आहे की, मुले त्यांच्या मित्रांसोबत आपापल्या रूममध्ये राहू लागले. आम्हाला कधी कधी कळतही नाही की, ते घरी आहेत की, नाही. आम्ही मुलांसोबत घालवलेला वेळ आठवू लागलो. आर्यन शिक्षणासाठी लंडनला गेला आहे आणि आता मुलगीही जाणार आहे. आम्ही मुक्त विचारांचे पेरेंट्स आहोत. मुलांना जे हवे आहे, ते ते करू शकतात. पण आम्ही मुलांना मिस करू लागलो होतो."

 

यामुळे शाहरुखने सरोगसीचा पर्याय निवडले... 
सांगितले जाते की, अबरामच्या जन्माच्यावेळी गौरीचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त होते. या वयात बेबी कन्सिव्ह करणे घातक ठरले असते. त्यामुळे शाहरुखने मुलाच्या जन्मासाठी सरोगसीचा आधार घेतला. रिपोर्ट्सनुसार, गौरीची वाहिनी नमिता छिब्बर अबरामची सरोगेट आई आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...