Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Abuse with girl taking out of college

काॅलेजच्या वर्गातून बाहेर अाेढत नेत मुलीशी गैरवर्तन, संशयितास अटक

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 11:00 AM IST

तुझ्या बापाने माझ्याविरुद्ध केलेली केस मागे घेतली नाही तर तुला जिवे मारेल', अशी धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडली.

  • Abuse with girl taking out of college

    नाशिक- गंगापूरराेडवरील महाविद्यालयात वर्गात बसलेल्या विद्यार्थिनीला अचानकपणे प्रवेश करून तरुणाने जबदरस्तीने बाहेर अाेढून अाणत 'तुझ्या बापाने माझ्याविरुद्ध केलेली केस मागे घेतली नाही तर तुला जिवे मारेल', अशी धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकाराने महाविद्यालय अावारात राजराेस गुंडगिरी सुरू असल्याच्या प्रकारावरून शाळा-महाविद्यालयांतील मुलीही असुरक्षित असल्याचे व पाेलिसांचा गुंडांना धाकच उरला नसल्याचे चित्र अाहे. या प्रकाराने पालकवर्गात संताप व्यक्त केला जात अाहे.


    गंगापूर पाेलिस ठाण्यात मुलीच्या तक्रारीनुसार, संशयित शुभम रमेश सांगळे (रा. नरहरीनगर, पाथर्डी फाटा) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सांगळे रहात असलेल्या भागातच विद्यार्थिनी रहात असून तिच्या वडिलांचा अाणि त्याचा वाद हाेता. या कारणावरून त्याने साेमवारी (दि. ३) दुपारी महाविद्यालयात येऊन वर्गात बसलेल्या या विद्यार्थिनीला इतर विद्यार्थ्यांच्या समक्ष अाेढत बाहेर नेले. तिच्याशी अश्लील वर्तन करीत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. सदर घटना गंगापूर पाेलिसांना समजताच वरिष्ठ पाेलिस निरीक्षक किशाेर माेरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पाेलिसांनी संशयित सांगळे यास अटक केली असून न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली अाहे.

Trending