आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुकीच्या धाकावर घरात बंद करून गर्लफ्रेंडला मारहाण करत होता बॉयफ्रेंड, मग मुलीने जे केले त्यामुळे घडली जन्माची अद्दल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - फ्लोरिडामधून एक मारहाणीची खळबळजनक घटना समोर आली आहे. व्हिडिओत दिसत असलेला तरुण आपल्या प्रेयसीला बेदम मारहाण करायचा. बंदुकीच्या धाकावर त्याने तिला घरात कैद करून ठेवले होते. यामुहे त्रस्त मुलीने ब्वॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी एक प्लॅन तयार केला. दोघेही आपल्या डॉगीच्या चेकअपसाठी जनावरांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. तेथेही तिचा बॉयफ्रेंड गन घेऊन पोहोचला होता. मुलीने वॉशरूमला जाण्याचा बहाणा केला आणि रिसेप्शनवर एक चिठ्ठी दिली.

 

चिट्ठीत लिहिली होती आरोपीची पूर्ण कहाणी
यात लिहिले होते- 'पोलिसांना बोलवा, माझा बॉयफ्रेंड धमकी देत आहे. त्याच्याकडे गन आहे. त्याला जाऊ देऊ नका.' यानंतर ती बॉयफ्रेंडकडे गेली. रिसेप्शनिस्टने ती चिठ्ठी वाचली आणि हिंमत करून पोलिसांना गुपचूप कॉल केला. त्या वेळी मुलगी बॉयफ्रेंडसोबत एकटीच त्या रूममध्ये बसलेली होती. 15 मिनिटांनी पोलिस आले आणि त्यांनी तरुणाला अटक केली. यानंतर मुलीने पूर्ण कहाणी सांगून बॉयफ्रेंड कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.  

 

 

बातम्या आणखी आहेत...