आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या भिंतीवर लिहिले अपशब्द; फडणवीस म्हणाले- आम्हाला बदनाम करण्याचे राजकारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मालाबार हिल्स येथील 'वर्षा' बंगल्याच्या भिंतीवर अपशब्द लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे, या विद्रुपीकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या भिंतीवर UT असे लिहून आक्षेपार्ह शब्द लिहिण्यात आले. यासोबतच, 'भाजप रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स' असेही कोरण्यात आले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सुद्धा नुकताच समोर आला. पण, हे शब्द कुणी आणि का लिहिले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही ज्यांना बंगल्यात प्रवेश करण्याची परवानगी आहे त्यानेच हे कृत्य केले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.

आम्हाला बदनाम करण्याचे गलिच्छ राजकारण

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून यावर एक प्रतिक्रिया आली आहे. त्यानुसार, माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी तेथील भिंती स्वच्छ होत्या. असे काहीही लिहिलेले दिसून आले नाही. आम्हाला बदनाम करण्यासाठी हे एक प्रकारचे गलिच्छ राजकारण आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सगळंच माहिती आहे अशा शब्दांत भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.

बंगला सोडून 15 दिवस झाले - अमृता फडणवीस

याच मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या- 'हे पाहून अतिशय आश्चर्य होत आहे. बंगला सोडून जवळपास 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस लोटले आहेत. बंगला सोडला तेव्हा सर्वच व्यवस्थित होते. एकदा बंगला सोडल्यानंतर आम्ही परत त्या ठिकाणी कधीच गेलो नाही.' आता हे कृत्य नेमके कुणी केले आणि सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ नेमका कुठून शेअर करण्यात आला याचा तपास केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...