आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणाबाजी करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना प्राध्यापकाचा दंडवत; प्रोफेसरच नाटकी आहे- ABVP चा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदसौर (मध्य प्रदेश )  - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना येथील एका प्रोफेसरने त्यांना दंडवत घालून क्षमायाचना केली. हा व्हिडिआे काही तासांतच सार्वत्रिक झाल्याने यावर आता राजकारण सुरू झाले. अभाविपचे जिल्हा अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले की, प्रोफेसरने केवळ नाटकीपणा करण्यासाठी दंडवत घातले. प्रसिद्धीसाठी केलेला हा हीन प्रयत्न अाहे. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास रोखले होते, असा दावा शर्मांनी केला आहे.  

 

निकालाची तारीख उलटून गेल्यावरही बरेच दिवस निकाल जाहीर न झाल्याने अभाविप कार्यकर्ते निवेदन देण्यास  महाविद्यालयात गेले होते. भारतमाता की जय म्हणू नका, असे प्रो. दिनेश गुप्तांनी त्यांना बजावले. या घोषणेवर आक्षेप का, असा प्रश्न विद्यार्थी कार्यकर्त्यांनी विचारला आणि वातावरण तापले. त्यानंतर प्रोफेसर गुप्ता यांनी दंडवत घालून विद्यार्थ्यांची माफी मागितली. तुम्ही गुरू आहात, असे करू नका, असेही अभाविप कार्यकर्त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यांनी याला पब्लिसिटी स्टंट म्हणून वापरल्याचे पवन शर्मा म्हणाले.  

 

या प्रकारावर काँग्रेसने टीका केली असून त्याला ‘सामाजिक आराजक’ म्हटले आहे. ही झुंडशाही असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यापूर्वी २००६ मध्ये उज्जैनमध्येही अभाविप कार्यकर्त्यांनी माधव कॉलेजचे प्रो. हरभजन सबरवाल यांना जबर मारहाण केली होती व त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.  यापूर्वीही मध्य प्रदेशातील राजकारणात अभाविपची आक्रमकता वादाचा विषय ठरला होता.

 

 

बातम्या आणखी आहेत...